दौंड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, तालुका अध्यक्ष पदी रवींद्र भाऊ कांबळे यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,Wed Sep 28 2022 12:39:59 GMT+0530 (India Standard Time)
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २७/०९/२०२२, दौंड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष, रामदास जी आठवले सामाजिक न्याय राज्य मंत्री भारत सरकार, यांच्या मार्गदर्शनाखाली पंच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष, सुर्यकांत वाघमारे, महाराष्ट्र राज्य संघटक सचिव, परशुराम जी वाडेकर, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी चंद्रकांता ताई सोनकांबळे, यांच्या उपस्थितीत प्रभारी अध्यक्ष शेलार साहेब यांनी दौंड तालुका अध्यक्ष पदी रवींद्र भाऊ कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले, तसेच दौंड तालुक्यातील नवनिर्वाचित कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली, या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, दौंड शहर व तालुक्याच्या वतीने हॉटेल सिटी इन सभा हॉल मध्ये करण्यात आले होते, याचे नियोजन रवींद्र भाऊ कांबळे, विकास कदम, सतीश थोरात,नरेश डाळींबे, प्रकाश भालेराव,रोहित दादा कांबळे, प्रभारी अध्यक्ष दौंड शहर,
कोर कमिटीच्या माध्यमातून करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सूर्यकांत जी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, नवनिर्वाचित सत्कारमूर्ती महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा,चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराष्ट्र राज्य संघटक सचिव, मा,परशुराम जी वाडेकर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आघाडी सरचिटणीस मा खाजाभाई शेख, गणेश जी गायकवाड, आबा वाघमारे, डॅडी सोनवणे, पुणे शहर अध्यक्ष शैलेंद्र भाऊ चव्हाण, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष उमेश कांबळे, आदी उपस्थित
दौंड तालुक्याच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, बारामती तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, माऊली कांबळे, प्रामुख्याने उपस्थित होते, या वेळी सत्कारमूर्ती चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम जी वाडेकर, सूर्यकांत जी वाघमारे,भारत सरोदे, विकास कदम, आबा वाघमारे, नवनाथ गायकवाड, यांनी पंक्षा संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर मनोगत व्यक्त केले, दौंड तालुक्याला पूर्व कालीन पॅंथरचा वारसा लाभलेला आहे, फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा हा बालीकिल्ला म्हणून ओळख जातो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा रामदास जी आठवले यांच्या आदेशानुसार दौंड तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र भाऊ कांबळे व कार्यकर्त्यांनी पक्षवाढीचे कार्य जोमाने सुरू करावे, भाजप रिपाइं युती असल्याने
स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाला म्हणावे तसे मित्र पक्षांकडून पाठबळ मिळत नाही, या संदर्भात राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जी आठवले साहेब यांना समक्ष भेटून स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात चर्चा केली जाईल असे आश्वासन चंद्रकांता ताई सोनकांबळे यांनी दिले आहे, पुढील काळात रिपाई आठवले गट निवडणूक चिन्ह उपलब्ध होण्याच्या पावित्र्यात वाटचाल सुरू केली आहे,असेही त्यांनी सांगितले.
तसेच परशुराम जी वाडेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र भाऊ कांबळे व कार्यकारणी पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले, तसेच मागील काळात पुणे जिल्हाध्यक्ष पदी दोन अध्यक्ष होते,मा रामदास जी आठवले साहेब दोन्ही अध्यक्षांबरोबर फोटोंमध्ये दिसत होते, आता मात्र हि भुमिका चालणार नाही, असे स्पष्ट मत मांडले आहे, सुर्यकांत वाघमारे यांनी बोलताना सांगितले पुणे जिल्हा अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी खुली संधी उपलब्ध करून देण्यात आली होती, मात्र पक्षात दुफळी निर्माण करण्याचा मानसुबा काही लोकांनी केला, असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली, दौंड तालुका माजी अध्यक्ष भारत सरोदे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून पुढील काळात पक्ष निष्ठा संदर्भात बोलताना म्हणाले या पुढे पक्षाच्या देह धोरणास बाधा होईल असे कृत्य करू नये पक्ष आदेशानुसार कार्य करावे येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत पक्षाने दिलेल्या आदेशानुसार कार्य व निवडणुकीत स्पष्ट भूमिका असावी, व पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी महत्वाची भुमिका घेऊन नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना भारत सरोदे यांनी सांगितले, आबासाहेब वाघमारे यांनी दिवंगत नेते हनुमंत साठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून आपल्या भाषणात बोलताना म्हणाले दौंड तालुक्यातील बौद्ध समाज मातंग समाज व इतर मागासवर्गीय बांधवांच्या एकजुटीने दौंड तालुक्याचे परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही, आज पर्यंत दौंड शहरातील रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वेळी समाज हितार्थ मोलाचे सहकार्य केले आहे, नगरपालिका निवडणुकीत मातंग समाजाच्या उमेदवाराला पाठबळ देऊन निवडणुकीत विजय केले, तसेच शहरातील अण्णाभाऊ साठे स्मारकाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा पाठिंबा मिळाल्याने अण्णाभाऊ साठे स्मारकाला नाव देण्यात आले, पुढील काळात बौद्ध समाजाबरोबर मातंग समाज असेल तर समाज हिताचे निर्णय अधिक सोपे होतील, येणाऱ्या काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत आबासाहेब वाघमारे यांनी दिले आहेत, विकास जी कदम यांनी बोलताना सांगितले दौंड तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्ष मित्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये दुर्लक्ष करतात लोकसभा व विधानसभा मर्यादित युती असल्याचा दावा केला जातो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये वेळोवेळी तोंडघशी पडण्याची परीस्थिती निर्माण होत आहे, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाने ठोस भुमिका घेऊन पुढील काळात जास्तीत जास्त प्रमाणात रिपब्लिकन पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच व जिल्हा परिषद सदस्य नगरपरिषद नगरपालिकात नगरसेवक दिसतील, असे महत्वाचे मार्गदर्शन विकास कदम यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश साळवे यांनी केले तर नवनाथ गायकवाड यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी दौंड शहर व ग्रामीण भागातील युवक महिला आघाडी शहर तालुका अध्यक्षा तसेच युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद