By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 19:12:27 GMT+0530 (India Standard Time)
ग्रामसुधार विचारमंच आयोजित शारदीय नवरात्रात उस्तव कार्यक्रमांत बोलताना खासदार डॉ विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आणि आमदारांवर जोरदार टीका केली पुणे जिल्हा सकळाई उपसासिंचन योजनेचे पाणी पळवत असताना राष्ट्रवादीचे आमदार वसुली करण्यात व्यस्त होते. जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले याचे आमदारांनी उत्तर द्यावे.
याचबरोबर मी तुमच्या वाढदिवसाला आणि लग्नाला आलो नसेल किंवा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात अंगढी साड्यांचे वाटप केले नसेल कारण मी जिल्हयातील युवापिढी चे भविष्य उज्वल करण्यासाठी काम करीत असल्याचा टोला खासदार डॉ विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या आमदाराला लावला आहे. जिल्हयातील वयोवृद्ध व्यक्तींना डोल मिळवण्यासाठी गरिबांना रेशन कुपण काढण्यासाठी शेतकऱ्यांचे खातेफोड करण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला पैसे देण्याची गरज नाही. पुढच्या सहा महिन्यात हे शासकीय अधिकारी तुमच्या दरात येतील आणि तुमची रखडलेली काम पैशाशिवाय पूर्ण करतील जर कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले तर माझ्या कडे या आपण त्या अधिकाऱ्याची एका दिवसात बदली करू असा विश्वास खासदार डॉ विखे पाटील यांनी नागरिकांना दिला.
मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे मी मतदानाचा विचार करत नाही. जिल्ह्यात वयोश्री योजनेच्या सहाय्य साहित्यांचे वाटप करीत असताना कोणी मला मतदान केले नाही केले कोण कोणत्या पार्टीचा याचा विचार नाही केला एकाएका लाभार्थ्याला जवळपास दहा हजारांचे साहित्य मिळाले आहे. मी कामात राम मानणारा माणूस आहे. लवकरच सारोळा कासार नागरिकांसाठी विखे पाटील हॉस्पिटलच्या वतीने मोफत नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्मा देण्यात येईल आणि ज्यांना मोतीबिंदू असेल अशा सगळ्याची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार असल्याची माहिती खासदार डॉ विखे पाटील यांनी दिली.
नागरी सत्कार सकळाई उपसा सिंचन योजनेचा दोन महिन्यात सर्व्हेक्षण अहवाल देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. यासाठी खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि मा. आ. शिवाजीराव कर्डिले यांचा सारोळा कासार नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार केला यावेळी गावच्या महिला सरपंच यांनी खासदार डॉ विखे पाटील यांच्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखाचे आणि आनंदाचे दिवस पाहणार असल्याची भावना व्यक्त केली. वाचक क्रमांक :