By : Polticalface Team ,Mon Oct 03 2022 19:42:01 GMT+0530 (India Standard Time)
रफिक शेख यांचे वडिलोपार्जित असलेली पारगाव मौला तालुका जिल्हा अहमदनगर येथील जमीन मिळकत गट क्रमांक 46 हे क्षेत्र सामायिक असून यामध्ये एकूण 5/40 हेक्टर एवढी जमीन आहे सदर मिळकत मध्ये वारसदार एकूण 19 सदस्यांची नावे आहेत हे सर्व जमीन आज रोजी एकत्रीत व सामायिक क्षेत्र आहे कोणाचेही वाटप पत्र झालं नाही असताना देखील बागवान मोहम्मद अरफात शौकत यांना रफिक शेख तुमच्या नावावर तुमचा हिस्सा करून देतो असे आमिष दाखवून सदर जमिनीची खरेदी त्यांच्या नावावर न करता स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे ,
रजिस्टर ऑफिसने वाटप पत्र न बघता खरेदी कोणाच्या सांगण्यावरून करून घेतली आहे कोणाचेही क्षेत्र वाटत नसताना खरेदी रजिस्टर कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत बागवान यांनी खरेदी करताना वाटप पत्र नसताना माहीत असून देखील कोणत्या कायद्यानुसार खरेदी करून व शासनाची व रफिक शेख यांच्या कुटुंबीयांच्या फसवणूक करण्याचा अधिकार त्यांना आहे का ?
सदर रफिक शेख हे वयवृद्ध आहेत होते अशिक्षित आहेत याचा फायदा घेऊन सदर जमीन बागवान यांनी कोणताही मोबदला न देता एकत्रित सामायिकक्षेत्र असलेली जमीन खरेदी खताने स्वतःच्या नावावर करून घेतली अशाप्रकारे रफिक शेख यांचे घर फसवणूक केले आहे सदर जमिनीचे नोंद करण्यासाठी कामगार तलाठी यांच्याकडे 85 कलमानुसार अर्ज दाखल करावा लागतो किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागतो म्हणजे याचा अर्थ असा की बागवान यांना रफिक शेख यांना काही कळत नाही व त्यांच्या कुटुंब कोणालाही काही समजत नाही ते अत्यंत गरीब आहेत सदर जमिनीचे कागदपत्र जेव्हा रफिक शेख यांनी मागणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बागवान यांनी आपली फसवणूक केली आहे सदर घटनेची चौकशी केली असता बागवान यांनी रफिक शेख यांना प्रथम धमकवले व दमबाजी करून जीवनाची धमकी दिली आहे, स्वतःला वकील आहे असं म्हणून लोकांची फसवणूक करत आहेत माझ्या आई शिक्षिका आहे व आमचं घराणे शिक्षित आहे सर्व अधिकारी आमच्या खिशात आहेत, मी तुम्हाला सर्व भाषांमध्ये सांगू शकतो याचा अर्थ काय होतो सदर बागवान हे एकटे व्यक्ती नसून याच्यात मोटर रॅकेट आहेत, सदर रॅकेट मधील गुंड प्रवृत्ती लोक अनेक लोकांची फसवणूक केली असेल हे नाकारता येत नाही, त्यामुळे सदर घटनेची सखोल चौकशी कारवाई करण्यात यावी व रफिक शेख यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती सदर बागवान यांनी फसवणूक केल्याचे कागदपत्राचे पुरावे आहेत प्रशासकीय कार्यालयामध्ये दिले आहेत सदर तक्रारीची दखल न घेतल्यास मानव विकास परिषद तसेच स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत तर्फे अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मानव विकास परिषद संस्थेचे मा.अफसर शेख संस्थापक,राष्ट्रीय अध्यक्ष मानव विकास परिषद तसेच राष्ट्रीय संपर्क प्रमुख स्वतंत्र संपादक पत्रकार संघ भारत वतीने देण्यात आला आहे वाचक क्रमांक :