निवृत्ती आनंदराव खेतमाळीस यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी यासाठी आमरण उपोषण.

By : Polticalface Team ,Tue Oct 04 2022 09:24:47 GMT+0530 (India Standard Time)

निवृत्ती आनंदराव खेतमाळीस यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी यासाठी आमरण उपोषण. श्रीगोंदा प्रतिनिधी ;- श्रीगोंदा शहरात रस्त्याच्या वादातून निवृत्ती आनंदराव खेतमाळीस याना जबर मारहाण झाली होती याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या मात्र निवृत्ती खेतमाळीस याना जबर मारहाण झाल्यावर त्याचेवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक न करता उपोषण कर्त्यांच्या घरच्यांस दमदाटी केल्याचा आरोप उपोषण कर्ते रोहिणी खेतमाळीस यांनी निवेदनात म्हटले आहे

श्रीगोंदा मांडवगण रोडवरील कुदळे वस्ती जवळ रस्त्याच्या वादातून निवृत्ती आनंदराव खेतमाळीस याना जबर मारहाण झाली आहे त्यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दि २२ सप्टेंबररोजी भा . द . वि . कलम ३२६. १४३ , १४७ , १४८ , १४ ९ , ३२४ , ३२३ ५०४ , ५०६ , ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी आजपासून जखमी निवृत्ती खेतमाळीस यांच्या सुनबाई रोहिणी खेतमाळीस यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करणार सुरु केले आहे त्यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणतात कि माझे सासरे निवृत्ती आनंदराव खेतमाळीस यांना दि २१ सप्टेंबर रोजी सतीष पांडुरंग कुदळे , गोपीचंद कुदळे , प्रकाश कुदळे , राजाराम कुदळे , दिपक कुदळे , भगवान कुदळे , रशिक कुदळे , पांडुरंग कुदळे सर्व रा . कुदळे बस्ती , मांडवगण रोड , श्रीगोंदा ता . श्रीगोंदा जि . अहमदनगर यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला व जबर मारहाण केली. त्यामध्ये पोलिसांकडून आरोपींना अटक करण्याएवजी ते माझ्या कुटुंबाला त्रास देत आहेत व एकदरीत पोलिसाकडून आरोपींना फरार होण्यास व त्यांना अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी एकप्रकारे मदत केली जात असल्याची आम्हाला शंका असून परिसरामध्ये लोकांमध्ये तशी चर्चा आहे .

आम्ही दिलेले साक्षीदर व आमच्यावरती आरोपीकडून दबाव आणला जात असून तशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे . त्यामुळे आम्ही दिलेले साक्षीदार पुन्हा पोलीस स्टेशनला येण्यास तयार नाहीत तसेच आमच्या घराच्या आसपास व शेतामध्ये दि .२७ऑक्टोबर रोजी काही व्यक्ती विनाकारण थाबल्याचे आढळून आले आहेत . त्यामुळे आम्हाला शेतीकडे जाणे व आहे तिथे वावरणे धोक्याचे वाटत आहे . तसेच माझ्या कुटुंबातील सर्व माणसे भयभीत आहेत . सामनेवाले हे मनुष्यबळाने जास्त असून त्याची मोठ्या राजकीय पुढाऱ्याबरोबर चांगले संबंध आहेत .त्यामुळे रोहिणी खेतमाळीस यांनी म्हटले आहे कि यांच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झाला असून या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अभय देण्यात येत आहे त्यामुळेच काही आरोपीना अटक करण्यात येत नाही त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी या मागणीसाठी रोहिणी खेतमाळीस यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात उपोषण सुरु केले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद