भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षक पदी प्रशांत चव्हाण.
By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 17:38:39 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक मीराताई आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोदी पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्यावतीने चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले होते या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्हा शाखेतून प्रशांत चव्हाण सर यांची निवड करण्यात आली होती. चव्हाण हे भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुक्याचे माजी अध्यक्ष ,श्रामनेर बौद्धाचार्य व उत्कृष्ट प्रवचनकार आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्रीय कमिटीने त्यांचे केंद्र शिक्षक पदी निवड केलेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भगवंतराव गायकवाड सरचिटणीस राजेंद्र साळवे सचिव सतीश ओहोळ उपाध्यक्ष वीरेंद्र पवार यांनी अभिनंदन केले आहे. त्यांचे निवडीबद्दल श्रीगोंदा तालुका व नगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
वाचक क्रमांक :