By : Polticalface Team ,Mon Oct 10 2022 19:18:10 GMT+0530 (India Standard Time)
मुंडे म्हणाले की, मी भाजपमध्ये असताना अमरसिंह पंडित यांना चकली देऊन भाजपमध्ये नेले होते. त्यानंतर ते आमदार देखील झाले. मात्र त्यानंतर भैय्यासाहेबांनी म्हणजे अमरसिंह पंडितांनी मला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं. त्यानंतर मी देखील आमदार झालो, असं यावेळी ते म्हणाले.
अमरसिंह पंडित हे माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचे चिरंजीव आहेत. तर विजयसिंह पंडित हे त्यांचे दुसरे चिरंजीव आहेत. विजयसिंह पंडित यांना गेवराई विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र गेवराई मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी सलग 40 वर्षे वर्चस्व राखलेले आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी भाजपमध्ये जाण्याचा आणि राष्ट्रवादीत येण्याचा किस्सा सांगितल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्तच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. वाचक क्रमांक :