राजेंद्र नागवडे यांनी सभासदांची दिशाभूल थांबवावी - श्री केशव मगर
By : Polticalface Team ,Fri Oct 22 2021 20:57:44 GMT+0530 (India Standard Time)
महाराष्ट्र शासनाकडून आपल्या सहकार महर्षी नागवडे कारखान्याच्या सन २०२०-२०२१ मध्ये गाळप झालेल्या उसाचा अंतिम एफ.आर.पी. रक्कम रुपये २४४४.४० प्रती मेट्रिक टन दराबाबत कोणताही लेखी आदेश प्राप्त नसतानाही कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे हे सभासदांची दिशाभूल करीत आहेत, त्यांनी जर सदरील आदेश प्राप्त झालेला असेल तर येत्या ७ दिवसात त्याची वर्तमानपत्रात पुराव्यासहित प्रसिद्धी द्यावी असे जाहीर आव्हान श्री केशव मगर यांनी नागवडे यांना केले आहे.
सहकार महर्षी नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन समारंभात कारखान्याचे चेअरमन नागवडे यांनी सांगितले होते कि, शासनाच्या आदेशाप्रमाणे आपल्या कारखान्याची सन २०२०-२०२१ या वर्षात गाळप झालेल्या उसाची अंतिम एफ.आर.पी. दर रक्कम रुपये २४४४.४० प्रति मेट्रिक टन आहे, व कारखान्याने सभासदांच्या बँक खात्यात संपूर्ण रक्कम वर्गही केली आहे. परंतु शासन दरबारी उसाचा अंतिम एफ.आर.पी. दराबाबत सविस्तर माहिती घेतली असता अशी माहिती मिळाली की शासनाची २०२०-२१ अंतिम एफ.आर.पी. ऊस दर कमी केलेला कोणताही आदेश शासनाने निर्गमित केलेला नसून उसाच्या अंतिम एफ.आर.पी. दराबाबत निर्णय शासन दरबारी प्रलंबित असताना नागवडे कारखाण्याची एफ.आर.पी. कमी झाली कशी? असा प्रश्न मगर यांनी उपस्थित केला आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या चालू गळीत हंगामास जाणाऱ्या उभ्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी साखर आयुक्तालयाने कारखान्यास चालू वर्षी चा गाळपामध्ये अटी व शर्ती घालून ऊस गाळपास परवानगी दिलेली आहे. गाळप झालेल्या उसाचा प्रस्तावित केलेला अंतिम एफ.आर.पी दर रक्कम रुपये २४४०.४० प्रति मेट्रिक टन या अंतिम प्रस्तावित केलेल्या दरास शासनाचा लेखी मान्यता आदेश प्राप्त झाला नाही तर मूळ एफ.आर.पी. रक्कम रुपये २६६१ प्रति मेट्रिक टन या दरानुसार देण्याच्या अटीवर गाळप परवाना दिलेला आहे.
एफ.आर.पी. बाबत शासनाचा आदेश न आल्यास कारखान्याने शेतकऱ्यांची उर्वरित रक्कम रुपये २१६.६० प्रती मेट्रिक टन प्रमाणे राहिलेली रक्कम सभासदांना वेळेत केली नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयीन लढाई लढण्यासही आम्ही तयार आहोत असे मगर म्हणाले.
चालू हंगामात अंबालिका शुगर ने २८०० रुपये तर दौंड शुगरने २८७५ रुपये प्रति मेट्रिक टन दर जाहीर केलेला आहे. कारखान्याचे गाळप हंगाम चांगले व्हायचे असेल तर आपल्याला सुद्धा त्यांच्या तुलनेत ऊसदर जाहीर करावे लागेल तो आज अखेर जाहीर केलेला नाही तरी तो त्वरित जाहीर करणे कारखान्याच्या हितासाठी अत्यंत आवश्यक आहे असे मगरे यांनी म्हटले आहे.
नागवडे कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्याचे भाग खरेदीसाठी दिलेल्या अहवालानुसार कारखाना कार्यक्षेत्रातील जवळपास ६००० शेतकऱ्यांचे कोरोना सारख्या महाभयंकर रोगाचे संकट असतानाही कारखान्यावर गर्दी करून १०१०० रुपये याप्रमाणे शेअरची रक्कम रुपये सहा कोटी कारखान्याकडे जमा आहेत. या घटनेला सात महिने होऊन गेले व या रकमेचा कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठा हातभार लागला आहे परंतु इतके दिवस झाले तरी संचालक मंडळाने त्यांना सभासद करण्याचा निर्णय घेतला नाही व त्या शेतकऱ्यांना ही लेखी कळविले नाही वास्तविक पाहता सहकार कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही सहकारी संस्थेने भागीदारी पोटी रक्कम स्वीकारलेल्या तारखेपासून ६० दिवसात संबंधित व्यक्तीस भागधारक सभासद केले बाबत अथवा नाकारल्या बाबत सबळ कारणासहित लेखी कळविणे बंधनकारक आहे. त्याबाबत काहीही न कळविल्यास संबंधिताने रकमेची मागणी केल्यास दसादशे १५% व्याज दराने रक्कम परत करण्यात यावी अशी कायद्याची तरतूद आहे जर त्यांना वेळीच सभासद केले असते तर त्यांना चालू वर्षी आपल्या ऊसाच्या लागवडीची नोंदणी कारखान्यावर सभासद म्हणून करता आली असती. तरी या सर्व बाबींची त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी
अमोल झेंडे
वाचक क्रमांक :