सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधातील आंदोलनाला मोठे यश !!

By : Polticalface Team ,Wed Dec 01 2021 15:07:54 GMT+0530 (India Standard Time)

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधातील आंदोलनाला मोठे यश !! आष्टी प्रतिनिधी: सक्तीची वीजबिल वसुली करण्यासाठी महावितरणने बीड तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातील वीज कनेक्शन तोडलेले असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी महावितरण विरोधात कमालीचा संतप्त झालेला असल्यामुळे व विद्युत मोटारीच्या प्रति कनेक्शनसाठी सात हजार पाचशे रुपये भरले तरच तोडलेली वीज कनेक्शन पूर्ववत करणार असा फतवा विद्युत वितरण कंपनीने काढल्यामुळे अगोदरच अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही याचाच एक भाग म्हणून भाजपा किसान मोर्चा बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिंदुसरा प्रकल्प पाली येथील तलावामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यासाठी शेकडो शेतकरी बांधव एकत्रित आले होते यावेळी काही शेतकरी बांधव तलावामध्ये उतरून सक्तीची बिल वसुली न करता प्रेमाची बिल वसुली करावी व प्रति डीपी वीस हजार रुपये भरणा करून घेऊन तात्काळ बीड तालुक्यातील सर्व डीपी जोडाव्यात व अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये याच बरोबर मांजरसुंबा महसूल मंडळातील हजारो शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाच्या चुकीमुळे पीक नुकसान अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे सदर अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी प्रतिनिधींनी सुमारे तीन तास पाण्यात उभे राहून आंदोलन केले यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता बीड जिल्हा माननीय निकम साहेब, उप अभियंता बीड तालुका गुंजाळ साहेब यांनी विद्युत पुरवठा तीन-चार दिवसात चर्चा करून मार्गी लावू असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र तात्काळ वीज जोडणी साठी वाटेल ती किंमत मोजण्याची शेतकऱ्यांनी चंग बांधला त्यामुळे निकम साहेबांनी अधीक्षक अभियंता महावितरण बीड माननीय कोलप साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत कोलप साहेब व बाळासाहेब मोरे यांची चर्चा घडवून आणली आम्ही वीस हजार रुपये प्रति डीपी प्रमाणे पैसे भरायला तयार असल्याचे मोरे यांनी कळविल्यानंतर कोलप साहेब यांनी प्रति डीपी तीस हजार रुपयाचा आग्रह धरला मात्र संतप्त शेतकर्‍यांचा रोष पाहता प्रति डीपी पंचवीस हजार रुपये प्रमाणे पैसे भरून घेण्याचे कोलप साहेब यांनी मान्य केले तसेच महसूल मंडळ मांजरसुंबा अनुदाना बाबत मंडळ अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधत विचारणा केली असता माननीय जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी सदर अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवल्याचे सांगितले याप्रश्नी विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून बाळासाहेब मोरे यांनी सदरचा विषय मार्गी लावावा असे ठरले त्यामुळे शेतकरी बांधवांच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश आले असून उद्यापासून पंचवीस हजार रुपये प्रती डीपी प्रमाणे पैसे भरून तात्काळ वीज जोडणी करण्यात येणार आहे संपूर्ण बीड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली वीजजोडणी करून घ्यावी ज्या ठिकाणी पंचवीस हजार रुपये भरून डीपी जोडण्यात येणार नाही अशा शेतकरी बांधवांनी बाळासाहेब मोरे यांच्याशी संपर्क साधावा संपूर्ण बीड तालुक्यातील वीज जोडणी पूर्ण होईपर्यंत स्वस्त बसणार नाही असे याप्रसंगी बाळासाहेब मोरे पाटील यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब मोरे यांच्यासह भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय डॉ. गणेशजी ढवळे, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष अशोक येडे, भ्रष्टाचार निर्मूलन समिती बीड तालुका अध्यक्ष युनूस शेख, सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे, बाळसिंग परदेशी युवा नेता भारतीय विद्यार्थी सेना, बाबासाहेब शिंदे, कांबळे भैया युवा नेता वंचित बहुजन आघाडी, सुनील फाटक यशवंत सेना बालाघाट प्रमुख, खडकीघाट चे माजी सरपंच दादासाहेब वाघमारे, अशोक शिंदे बोरखेडकर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री उबाळे साहेब व उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती स्फोटक असतानाही परिस्थिती अत्यंत व्यवस्थितपणे हाताळली कुणाला सर्वांच्या भक्कम पाठबळावरच शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय झाला असून सर्व उपस्थित शेतकरी, कष्टकरी, महावितरण, महसूल प्रशासन, पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधवांचे बाळासाहेब मोरे पाटील यांनी जाहीर आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद