जामखेड येथील तहसीलदार यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर घातलेले निर्बंध मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन भिमटोला सामाजिक संघटनेची मागणी
By : Polticalface Team ,Fri Dec 03 2021 17:53:52 GMT+0530 (India Standard Time)
जामखेड प्रतिनिधी-
ओमिक्रोम या नवीन विषाणू प्रजाती मुळे 6 डिसेंबर 2021 रोजी महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमास दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजीचे परिपत्रक राज्य शासनाने काही अटी आणि शर्ती घातलेले आहेत त्यामध्ये बराच दुजेपणा व विसंगती दिसून येते एकीकडे पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या त्या ठिकाणी कोणत्याही नियमांचा व लस न घेतलेल्या नियमांचा विचार केला नाही या कार्यक्रमास येणारे लाखो अनुयायी सज्ञान व covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करणारे आहेत तरी या ठिकाणी शासनाने लाखो अन्यायावर अन्यायकारक निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काही पुस्तकांचे विक्रीचे स्टॉल, खाद्यपदार्थांची दुकाने व इतर व्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात वार्षिक आर्थिक नुकसान होणार आहे त्या आधीच covid-19 सलग दोन वर्षे त्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे शासन एकीकडे लसीकरण 90% झाल्याचे माध्यमातून प्रसारित करत आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी तयारी केली असता शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे व्यावसायिकांचे यावर्षीदेखील कंबरडे मोडणार आहे. तसेच राज्यात इतर कोणत्याही राजकीय सामाजिक व धार्मिक ठिकाणी निर्बंध नाहीत राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्या ठिकाणी सभा पक्षप्रवेश रॅली यांच्यावर कुठलाच सरकारचे निर्बंध घातलेले दिसत नाही परंतु थोर महापुरुष या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमास बंदी घालणं हा शासनाचा सामाजिक भेदभाव पण आम्हाला दिसून येत आहे त्यामुळे लाखो अनुयायांच्या मनामध्ये राज्यसरकार बद्दल गैरसमज निर्माण होताना दिसत आहे त्यामुळे राज्य शासनाने वरील सर्व बाजूंचा विचार करून महापरिनिर्वणा च्या कार्यक्रमास काही अटी आणि शर्ती घातलेले आहेत ते त्वरित मागे घ्यावेत अन्यथा सर्व राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही सर्व बांधवांच्या भावना तीव्र असल्याने राज्य सरकारने याचा पुनर्विचार करून योग्य ती समाजहिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी जामखेड मधील भीमटोला सामाजिक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवाजी ससाने, जोगेंद्र थोरात, गणेश घायतडक, विशाल अब्दुले, अनिल जावळे, सुर्यकांत सदाफुले, रावसाहेब जाधव, बाळासाहेब साळवे आदी भीम अनुयायी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद