बीड जिल्हा शिक्षण विभागाच्या चुकीमुळे व विनयकुमार केंडेच्या कृतीमुळे न्यायमंञ्याचा बीड जिल्हा बदनाम --विवेक कुचेकर
By : Polticalface Team ,Mon Dec 06 2021 16:02:27 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी: भाई उध्दवराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अनुसूचित जातीच्या जागेवर अनाधिकृतपणे ठाण मांडून बसलेला शिक्षक विनयकुमार केंडे यांच्यावर बीड जिल्हा शिक्षण विभाग व खाजगी शिक्षण संस्था कधी कारवाई करणार असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक( बाबा )कुचेकर यांनी बीड जिल्हा शिक्षण विभाग व शिक्षण संस्थेला विचारला आहे
सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सर्वाना मोफत शिक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने व केंद्र सरकारने गाव तिथे शाळा सुरू करण्याचा विचार मांडला असतानाच काही संस्था चालक जातीचे राजकारण करून नियमाची पायमल्ली करताना दिसतात पविञ अशा शिक्षण विभागातच अधीकारयाने लक्ष बिंदुनामावली न पाहता केवळ स्वताचा आर्थिक फायदा व्हावा म्हणून जो पैसे देईल त्याला पदे देण्याचा कुठील डाव मनुवादी समाजाने घेतलेला पाहावयास मिळत आहे यातच स्वताला पुरोगामी म्हणवणारया माजी आमदार भाई जनार्दन तुपे यांच्या शिक्षण संस्थेत अनुसुचित जातीच्या राखीव जागेवर ब्राह्मण शिक्षक नियुक्त करून मागासवर्गीय पदाचा घोर अपमान केलेला आहे सदरील मुख्याध्यापकाचे अनेक कारणामे उघड होत असुन बीड जिल्हा शिक्षण विभाग न्यायमंञ्याच्या जिल्हयात बदनाम होत आहे तरी शिक्षण विभागाने व शिक्षण संस्थेने लवकरात लवकर विनयकुमार केंडे यांच्यावर कारवाई करावी नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र भर आंदोलन केले जाईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा) कुचेकर यांनी दिला आहे
वाचक क्रमांक :