चौसाळा--सुलतानपुर रस्तयाची झाली चाळणी --विवेक कुचेकर आमदार- जिल्हा परिषद सदस्य मुग गिळुन गप्प वंचित करणार रस्त्याच्या मध्यभागी वृक्षारोपण
By : Polticalface Team ,Sat Dec 11 2021 17:02:12 GMT+0530 (India Standard Time)
(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हापरिषद सर्कल मध्ये येत असलेल्या चौसाळा ते सुलतानपुर रस्तयाची मोठया प्रमाणावर चाळणी झाली असुन या रस्त्यावर रहदारी करणारयांना खडतर प्रवास करावा लागत असुन या रस्तयावर जागोजागी खड्डे पडले असुन रस्त्यावरील खड्डी संपुर्णत उघडी पडली असल्यामुळे दुचाकीचे अनेक अपघात याठिकाणी घडले असुन अनेकांचे अपघात होवुन दुखापती झाल्या आहेत
चौसाळा ते सुलतानपुर हा रस्ता पाच किलोमीटर चा असुन संपुर्ण रस्त्याची चाळणी झाली आहे गेल्या सात वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाल्याने पंधरा गावातील नागरिकांना धुळीतुन प्रवास करावा लागत आहे तर रहदारी करणारया वाहनधारकांचे मोठे नुकसान होत असुन मान,पाठ,कंबरेचा मोठा ञास उध्दभवत आहे या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आमदार साहेबांनी शब्द दिला होता की, या रस्तयाचे उदघाटन प्रथम करूत पंरतु निवडणूक संपल्यावर या सगळया आश्वासनाचे काय झाले असा शब्द सर्व सामान्य नागरिक विचारताना दिसत आहे त्याच बरोबर चौसाळा जिल्हा परिषद सदस्यानी या रस्तयाचा पाठपुरावा करून रस्त्याचे काम लवकरच मार्गी लावुत असा शब्द दिला होता पंरतु पाच वर्षांपासून हा रस्ता जसा आहे तसाच आहे
लोकप्रतिनिधी फक्त सर्व सामान्य जनतेला आश्वासनाची खैरात माती मारत असल्यामुळे चौसाळा ते सुलतानपुर रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुलतानपुर चौसाळा रस्तयावर मध्यभागी वृक्षारोपण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा )कुचेकर यांनी दिला आहे
वाचक क्रमांक :