By : Polticalface Team ,30-03-2024
करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर झालेली घट आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली वीज कपात यामुळे उजनी धरण काठावरील शेतकरी अडचणीत आला असून करोडो रुपये खर्च करून उभी केलेली पिके जळून जाण्याचा जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे
यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी झालेले पर्जन्यमान व उजनी धरणाच्या पाण्याचे झालेले चुकीच्या नियोजनाचा फटका करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार असून करमाळा तालुक्यातील उजनी धरण काठावरील शेतकरी आर्थिक अडचणी देणार आहे. सध्या मार्च महीना सुरू असतानाच उजनी धरणाच्या पाणी पातळी मायनस छत्तीस टक्केच्या खाली गेल्याने नऊ ते दहा हजार फूट पाणी खाली गेल्याने उजनी धरणावरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पाणीपुरवठा पाण्याअभावी योजना बंद पडल्या आहेत . धरण काठावरील ज्या गावातील शेतकऱ्यांनी करोडो रुपये खर्च करून धरणात चारी खोदून पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या पाणीपुरवठा योजना सुरू असल्या तरी सध्या प्रशासनाने दोन तास वीज कपात करण्याचे आदेश दिल्याने या योजनाही अडचणीत आले आहेत.
प्रतिक्रिया
1 वैभव पोळ ( शेतकरी शेटफळ ता करमाळा) पाणी पातळी खालावल्यानंतर उजनी धरणातून दहा हजार फूट चारी खोदून शेतकऱ्यांनी पाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने वीज कपातीचा निर्णय घेतल्याने पाण्याअभावी केळी सारखी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके वाया जाणार आहेत.
प्रतिक्रिया
२) बापूराव चोरमले (शेतकरी चिखलठाण ता करमाळा ) उजनी धरणातील पाण्याचे सुरवातीपासूनच योग्य नियोजन करणे गरजेचे होते. नदी व कॅनलच्या तुलनेत शेतीपंपाद्वारे धरणातून उपसा होणाऱ्या पाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या प्रशासनाने वीज कपातीचा घेतलेला निर्णय हा धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्यायकारक असून लवकरच तालुक्यातील सर्व तर शेतकरी एकत्र येऊन याच्या विरोधात आंदोलन करून या निर्णयाला विरोध करणार आहेत
वाचक क्रमांक :