By : Polticalface Team ,16-12-2024
प्रतिनिधी:- शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी फटाक्यांच्या आतिषबाजीत व वाद्यांच्या गजरात नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे वांगदरी गावामध्ये समस्थ ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले,निमित्त होते नवनिर्वाचित आमदार यांची पेढे तुला व नागरी सत्कार. निवडणूक काळात विक्रमसिंह पाचपुते प्रचारार्थ व दर्शनासाठी वांगदरी गावातील पुरातन अंबिका माता मंदिरात गेले असताना उपस्थित नागरिकांसमोर वांगदरीचे माजी सरपंच रामदास मासाळ यांनी विक्रम दादा निवडून आल्यानंतर गावच्या वतीने त्यांच्या वजना एवढे पेढे देवीसमोर पेढेतुला करून वाटू असा नवस देवीला केला होता,त्याची नवसपूर्ती आज देवीच्या मंदिरासमोर करण्यात आली. विक्रमसिंह पाचपुते आमदार झाल्यानंतर नवसपूर्तीसाठी आपण वांगदरीतील पुरातन अंबिका माता मंदिरात यावे अशी विनंती गावकऱ्यांनी केल्याने गावच्या विनंतीला मान देत नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते व माजी मंत्री बबनराव पाचपुते हे शनिवारी वांगदरी गावात आले असता,मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले व पेढेतुला करुन गावच्या वतीने जाहीर नागरी सत्कारासह सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी बोलताना आमदार पाचपुते म्हणाले की ,वांगदरी गावाने मला जे प्रेम दिले आहे त्याबद्द्ल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. २००९ च्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत वांगदरी गावाने दुपटीपेक्षा जास्त मतदान आमच्या पारड्यात टाकले असून तालुक्यात विकासकामे करत असताना वांगदरी गावातील विकासकामांसाठी निधी कमी पडून देणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार पाचपुते यांनी दिली. मी पुढील पाच वर्ष आमदार म्हणून नाही तर जनसेवक म्हणून तालुक्यात काम करून आपला विश्वास सार्थ ठरवील. तसेच कार्यकर्त्यांच्या कुठल्याही प्रसंगात त्याच्या खांद्याला खांदा लावून हा विक्रम पाचपुते उभा असेल असा आशावाद आमदार पाचपुते यांनी व्यक्त केला. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी विकास कामाबाबत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली जाईल व वांगदरी गावच्या विकासासाठी निधी कमी पडू न देता गावच्या विकासात योगदान दिले जाईल असे सांगितले.यावेळी कार्यक्रमास डॉ.दत्तात्रय नागवडे, भाजपाध्यक्ष संदीप नागवडे, माजी सरपंच रामदास मासाळ, बाबासाहेब चोरमले ,महादेव दरेकर, शहाजी पवार,अरविंद हराळ, पाराजी मासाळ, रंगनाथ पारखे, जयसिंग पारखे,किसन मासाळ,अर्जुन टुले,रवी पाटील नागवडे,बाळासाहेब हंडाळ ,सचिन चोरमले,राजेंद्र दळवी, हनुमंत हराळ,प्रवीण नागवडे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वाचक क्रमांक :