मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

By : Polticalface Team ,16-12-2024

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

श्रीगोंदा प्रतिनिधी : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात श्री गणेशा म्हणून केली जाते. सध्या रसिकांमध्येही अशाच एका श्री गणेशाची जोरदार चर्चा आहे. श्री गणेशा हा एक आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर नेणार आहे. मराठी फॅमिली एन्टरटेनर असलेला श्री गणेशा हा मराठीतील एक धमाल रोड मुव्ही आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

श्री गणेशा धमाल रोड ट्रीपचा आणि श्री गणेशा फॅमिली एंटरटेनमेंटचा असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या श्री गणेशा या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते, तर रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमानसापर्यंत मोलाचा संदेश पोहोचवणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे श्री गणेशाच्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे. मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज, मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडच ठरणार आहे. प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटक मधील गण्या नंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे. प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत. त्यांनी यात चक्क दाढी-मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारले आहे. भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहे. 

या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाली आहेत. आली मधुबाला... हे गाणे चांगलेच पॅाप्युलर झाले असून, टायटल ट्रॅकही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. हा एक रोड मुव्ही असल्याने यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहेत. या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, श्री गणेशाच्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणले आहे. यात केवळ विनोद नसून, इमोशन्सही आहेत. यातील नातेसंबंधांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. यासाठी प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अनुभवायला मिळेल. संजय नार्वेकरने आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. श्री गणेशाच्या माध्यमातून आपल्या टिमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचेही कवडे म्हणाले. 

दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथासुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्या सोबत मिळून पटकथालेखनही केले आहे. संजय नवगिरे यांनी संवादलेखन केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार वरुण लिखते यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन, तर सुमित पाटील कला दिग्दर्शन केले आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता, तर विनोद शिंदे सहदिग्दर्शक आहेत.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.

प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत

स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.

कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती

शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...

महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.

संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.

आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .

नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम

परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.

श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.