करमाळा प्रतिनिधी
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्यापासून सुरु झाल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी सांगितले की रब्बी पिकांसाठी डावा कालवा व चिलवडी शाखा यामधून आवर्तन सुरु झाले आसुन करमाळा तालुक्यात पाणी पोहचले आहे.
दि -18 ते 20 डिसेंबर वीट व झरे (सा. क्र. 240-235)
तसेच वीट सा. क्र. 235 ते 226
20 ते 21 रोजी दोन दिवस पाणी दिले जाणार आहे.
तर दि. 21 व 22 रोजी वजारवाडी,रावगाव,पिंपळवाडी (सा. क्र. 226 ते 223) पाणी दिले जाणार आहे.
दि. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान सा. क्र. 223 मधून मोरवड, कोर्टी, विहाळ व पोंधवडी या भागात पाणी दिले जाईल.
तर चिलवडी शाखा कालव्याद्वारे चारी क्र. 26/500 ते 34/500 मधून कुंभारगाव येथे पाणी दिले जाईल.
दि. 22 व 23 डिसेंबर रोजी सावडी मधील 21/620 ते 26/500 यातील उपचाऱ्यांना पाणी दिले जाईल.
तर दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी चिलवडी शाखा कोर्टी वितरकेमधून सावडी, कोर्टी व राजुरी या ठिकाणी पाणी दिले जाईल
आशा नियोजनातून करमाळा तालुक्यातील कुकडी डावा कालवा प्रकल्पामध्ये लाभ क्षेत्रात पाणी पोहचवले जाईल अशी माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.
आमदार नारायण आबा पाटील यांनी या आवर्तनासाठी निवडणूक निकालापासूनच आपला पाठपुरावा चालू ठेवला होता.यासाठी त्यांनी उपविभागीय आभियंता यांनाही आवर्तन योग्य रीतीने देण्याच्या सूचना केल्या आहेत. तर उपविभागीय अधिकारी स. र. जाधव यांनाही सदरचे आवर्तन हे महत्वाचे असण्याने कुकडी डावा कालवा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी बारकाईने लक्ष देऊन व समक्ष कार्यस्थळी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व लाभ क्षेत्रातील तलावात पाणी पोहचवावे असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सूचित केले आहे. पाणी वहन कालावधी, पाण्याची उपलब्धता यानुसार सदरच्या नियोजनात नाम मात्र बदल होण्याची शक्यता असल्याचे समजते परंतु आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून रब्बी कालावधीतील उभ्या पिकांना पाणी देण्यात येणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
भविष्यात मृत्यू नंतर मानवी शरीर शासन संपती म्हणून जाहीर करण्याची आवश्यकता आमदार राहुल कुल.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2. या अभियानात न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयाला तालुक्यात तृतीय क्रमांकाचे बक्षीस.
प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे प्रमाणपत्र न मिळाल्याने खेळाडू व शिक्षक हवालदिल , स्पर्धा आयोजनाचा निधीही प्रतिक्षेत
स्टेट बँक ऑफ इंडिया व्यवस्थापकांची श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास भेट
नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील विविध विषयांवर महत्वाचे मुद्दे मांडले.
कुकडीचे रब्बी आवर्तन उद्या पासून सुरू,,,,,,, आमदार नारायण आबा पाटील यांची माहिती
शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण उपसंचालक हरून आत्तार यांचा सन्मान, प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा
तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश
लिंपणगाव -काष्टी रेल्वे गेटच्या उड्डाणपुलाबाबत आमदार खासदारांनी लक्ष घालावे; प्रवासी व वाहन चालकांची मागणी
न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव च्या माजी विद्यार्थ्याचे चित्रपट क्षेत्रात पदार्पण.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांची पेढेतुला करून वांगदरीत केला आनंद साजरा.
मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा श्री गणेशा मराठी चित्रपट २० डिसेंबरला होणार प्रदर्शित...
महात्मा फुले नूतन महाविद्यालयात आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धा संपन्न.
संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मनुरुग्नावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. परभणी हिंसाचार प्रकरणी हवेली तालुका आर पी आय आक्रमक.
आमदार सत्यजित तांबे हे सुधीर तांबे यांचा वारसा पुढे चालवत आहेत - बाजीराव कोरडे .
नशीब बलवत्तर म्हणून शेतकरी श्री नेटवटे हे बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले ! लोणी व्यंकनाथमध्ये बिबट्याची दहशत कायम
परभणी येथील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांना बडतर्फ करावे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
महायुती ला साथ दिली तरी ही रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात न्याय मिळाला नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले.
श्री क्षेत्र माळवाडी पडवी येथे दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न. दौंड तालुक्यातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती.