By : Polticalface Team ,17-12-2024
लिंपणगाव ( प्रतिनिधी)-- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्यांवरुन ११ महिने करिता कार्यकाल वाढविण्यासाठी तहसील कार्यालय येथील निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव व पंचायत समिती शिक्षण विभागात निवेदन दिले आहे . शिकाऊ प्रशिक्षणार्थी यांनी श्रीगोंदे येथे मीटिंग घेऊन सर्वांनुमते आज निवेदन सादर केले .
संदर्भ - महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शा.नि.क.संकीर्ण
२०२४/प्र.क्र.९०/व्यंशी-३ दिनांक ९ जुलै २०२४
या संदर्भीय पत्रातील विषयातील अनुषंगाने महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे व या योजनेची अंमल बजावणी झालेली असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक-युवतींना शिक्षण ,आरोग्य, महसूल, कृषी विभागात कार्यरत करण्यात आलेले आहे.
तरी श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना ६ महिने ऐवजी ११ महिने करिता कार्यकाळ वाढविणेकरिता व नियमित पगार मिळणेकरिता लाभार्थी यांनी मागणी केली आहे .जेणे करून आमचे आई-वडील तसेच कुटुंब वासियांचे आम्ही सुशिक्षीत बेरोजगार असल्याच्या भावनात बदल होईल. अशी अशा उपस्थितांनी निवेदनात व्यक्त केली आहे. या मीटिंगसाठी हनुमंत उदांडे ,सचिन काळे ,रावसाहेब म्हस्के कार्यकाळ, ओंकार थेऊरकर ,अमोल कराळे ,शिवलिंग व्यवहारे ,सचिन नलगे, प्रताप येरकळ ,पवन रणदिवे ,विशाल साबळे ,संतोष भोसले ,प्रियंका खिलारे ,भाग्यश्री कांडेकर, पायल कोकाटे ,सोनाली शिर्के, शुभम हातवळणे उपस्थित होते अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली.