लसीकरणाचा वेग वाढवणार सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक: पालकमंत्री छगन भुजबळ
By : Polticalface Team ,Fri Dec 17 2021 20:49:05 GMT+0530 (India Standard Time)
जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता 23 डिसेंबर पासून सर्व सार्वजनिक आस्थापनांमध्ये प्रवेशासाठी लसीकरण बंधनकारक करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुखांवर निश्चित करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोविड सद्यस्थिती बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. निखील सैंदाणे, निवासी उपजिल्हाधिकारी भगवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, ओमायक्रॉन विषाणूचा धोका कमी असला तरी त्याचा प्रसार झपाट्याने होत असतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लसीकरणाची गती वाढविण्यात येणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्यांना दुसऱ्या डोस देण्यासाठी नियोजन करण्यात यावे. प्रशासकीय यंत्रणासोबतच नागरिकांनीही जबाबदारीने आपले लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोरोना व ओमायक्रॉनच्या धर्तीवर संबंधितांनी आवश्यक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याला देण्यात आलेल्या ऑक्सिजन लक्ष्यांकाच्या तुलनेत आजच्या स्थितीत जिल्ह्यात 378 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे व विविध मार्गाने तो सातशे मेट्रिक टन होऊन देखील अधिक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ओमायक्रॉन विषाणूच्या प्रसाराची गती अधिक असल्याने त्याच्या तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने टेस्टिंग करण्यासाठी दहा हजार तपासणी किटस् खरेदी करावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी विमान तळावर सुरक्षेच्या दृष्टिने प्रशासनाकडून व्यवस्था उभी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर 0.8 टक्के, मृत्यूदर 2.11 टक्के आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी दिली. पहिला डोस घेऊन दुसरा डोस न घेतलेल्या लोकांचा शोध घेऊन ही दरी लवकरात लवकर दूर करण्याच्या दृष्टीने सर्व विभाग काम करतील, असेही श्री मांढरे यांनी नमूद केले.
बैठकीच्या सुरूवातीला 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलान यशस्वीपणे पार पाडले, यासाठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सर्व प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेले सहकार्य देखील मोलाचे आहे, असे कौतुकही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद