जिल्हाधिका-यांनी विभागीय वन आधिका-यांची कानउघडणी केल्यानंतर एम.बी.कंद यांना आली जाग ;वनपरिक्षेत्र आधिका-यांना पत्रक, अहवाल सादर करा अन्यथा पुढील निधी मिळणार नाही
By : Polticalface Team ,Thu Dec 23 2021 14:13:55 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्ह्य़ातील जिल्हा वार्षिक योजनेतुन (सर्वसाधारण)सन २०१९-२०व सन २०२०-२१ जिल्हाधिकारी बीड यांनी वनविभागाला दिलेल्या १० कोटी ८४ निधीत गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व युवक जिल्हाध्यक्ष श्रीमंत उदयनराजे सेना प्रतिष्ठान ,शिवशंकर भोसले यांच्या तक्रारीवरून उपआयुक्त नियोजन, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशानंतर सुद्धा कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने जिल्हाधिकारी राधाबिशन शर्मा यांनी विभागीय वन आधिकारी (प्रादेशिक)बीड, विभागीय वन आधिकारी (सामाजिक वनीकरण)बीड, विभागीय वन आधिकारी (वन्यजीव)औरंगाबाद यांना पाठवलेल्या पत्रात विविध योजनेतील सन २०१९-२०ते २०२०-२१ पर्यंत प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची आणि त्यावर झालेल्या खर्चाचा कामनिहाय छायाचित्रासह सविस्तर अहवाल (खुलाश्यासह)तात्काळ कार्यालयास सादर करावा, यापुर्वी आपणास वारंवार कळविण्यात आलेले असुन सुद्धा अहवाल कार्यालयास सादर करण्यात आला नाही, दोन वेळा स्मरण पत्र पाठवुन सुद्धा आपण अद्याप अहवाल सादर केला नाही ही अतिशय गंभीर बाब असून आपल्या कार्यालयाचा सविस्तर अहवाल समक्ष भेटुन सादर करावा असे नमुद केले आहे.
सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)सन २०१९-२० व सन २०२०-२१ जिल्हाधिकारी बीड यांनी वनविभागाला जिल्हा नियोजन समिती मार्फत दिलेल्या १० कोटी ८४ लाख रूपये निधी गैरव्यवहार प्रकरणात उपआयुक्त, नियोजन, विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद ,जिल्हाधिकारी बीड, तसेच जिल्हा नियोजन आधिकारी यांनी वारंवार आदेश देऊन सुद्धा कोणतीही कारवाई न करता आदेशाची अवमानना केल्याबद्दल विभागीय वन आधिकारी वनविभाग बीड एस.बी.कंद यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन वनविभागीय आधिकारी मधुकर तेलंग व संबधित वनपरिक्षेत्र आधिकारी श्री.अमोल मुंडे, तसेच संबधित जबाबदार आधिकारी कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकार-यांच्या प्रत्यक्ष भेटून अहवाल सादर करण्याच्या आदेशानंतर विभागीय आधिकारी कुंद यांना जाग,अन्यथा निधी मिळणार नाही
___
जिल्हाधिकारी राधाबिशन शर्मा यांनी वारंवार कळवुन तसेच २ वेळा स्मरणपत्र पाठवुन सुद्धा अहवाल सादर न केल्याबद्दल गंभीर बाब असून समक्ष भेटुन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर विभागीय वन आधिकारी एस. बी.कंद यांना जाग आली असून वनपरिक्षेत्र आधिकारी (प्रादेशिक)बीड, परळी, आष्टी, धारूर, पाटोदा यांना परिक्षेत्र अंतर्गत जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन २०१९-२० मध्ये प्राप्त निधीमधुन तसेच सन २०२०-२१ मध्ये प्राप्त निधीमधुन करण्यात आलेल्या कामाचे प्रशासकीय मान्यता प्राप्त केलेल्या कामाचे कामनिहाय छायाचित्र २ प्रतिमध्ये हार्ड काॅपी व साॅफ्ट काॅपीसह (कामापुर्वीचे, काम सुरू असतानाचे, काम पुर्ण झाल्यानंतरचे)कार्यालयास तात्काळ सादर करावेत, सदर प्रकरणी छायाचित्र तात्काळ या कार्यालयास प्राप्त न झाल्यास सन २०२१-२२ साठी संबधित वन परिक्षेत्रास निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे केले आहे.
नेमके प्रकरण काय आहे
___
तत्कालीन जिल्हाधिकारी बीड राहुल रेखावार यांनी वनविभागातील विविध कामांसाठी मार्च २०१९-२० अंतर्गत मार्च २०२० ,मध्ये जिल्हा नियोजन समितीतुन एकुण १० कोटी ८४ लाख रूपये निधी वितरीत करण्यात आला होता. हा निधी ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च करणे अपेक्षित होते, शासन निर्णयान्वये हा निधी ३१ मार्च २०२१ रोजी पर्यंत खर्च न झाल्यास निधी शासनाला सरेंडर म्हणजेच परत करणे बंधनकारक होते परंतु हा निधी ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च करण्यात आला नाही, हा निधी शासनाला परत करावा लागेल म्हणून तत्कालीन वनविभागीय आधिकारी बीड श्री.मधुकर तेलंग यांनी नियमबाह्य रित्या बीड जिल्ह्य़ातील वनविभागाच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बॅकखात्यावर वळवण्यात आला. हा निधी संयुक्त वन व्यवस्थापन (JFM)समितीच्या खात्यावर टाकल्यावर कसल्याही प्रकारची कामे न करताच वनविभागातील आधिकारी-कर्मचारी यांचे नातेवाईक, मित्रमंडळी व ओळखीच्या लोकांच्या नावावर बोगस व्हाऊचर्स बनवुन उचलण्यात आला, कारण या समितीचा अध्यक्ष ज्या गावची समिती तेथील एक व्यक्ती असतो व सचिव वनविभागाचा वनपाल असतो. या दोघांच्या नावावर या समितीचे जाॅईन्ट अकांऊट असते.बीड जिल्ह्य़ामध्ये ५ वनपरिक्षेत्र आहेत, या ५ वनपरिक्षेत्रातील जवळजवळ १५ JFM समीतीच्या खात्यावर नियमबाह्य निधी वळवुन हा सर्व निधी श्री.मधुकर तेलंग यांच्या आदेशावरून उचलण्यात आला. JFM समितीच्या अध्यक्षाला १० टक्के रक्कम देऊन संगनमतानेच सर्वांनीच वन विभागीय आधिकारी बीड श्री.मधुकर तेलंग, ५ वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र आधिकारी १)ए.डी.मुंडे २)एम. एस.मुंडे ३)आर.बी.शिंदे ४)श्याम सिरसट ५)सायमा पठाण आणि वनपाल १)डी. एस.मोरे २)अशोक लांडगे ३)अंगद बहिरवाळ ४)शंकर वरवडे ५)कस्तुरे ६)डी.एस.फुंदे ७)धसे यांनी व JFM चे अध्यक्ष यांनी वनरक्षक, वन कर्मचारी, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक यांच्या नावावर निधीचा अपहार करण्यात आला.
संबधित प्रकरणात समाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना यांनी वारंवार निवेदन, आंदोलनानंतर सुद्धा एस. बी. कंद यांनी या गैरव्यवहार प्रकरणात श्री.मधुकर तेलंग व ईतर भ्रष्ट आधिका-यांचीच पाठराखण केली असून त्यांना चौकशीसाठी नियुक्त करण्यात आल्यानंतर सुद्धा खोटे अहवाल देऊन त्यांनी शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन अपहार प्रकरणातील संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद