दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी नवनाथ लोंढे यांची तर सचिवपदी शेषराव सानप यांची एकमताने निवड

By : Polticalface Team ,Sun Dec 26 2021 11:48:32 GMT+0530 (India Standard Time)

दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या आष्टी तालुकाध्यक्षपदी नवनाथ लोंढे यांची तर सचिवपदी शेषराव सानप यांची एकमताने निवड आष्टी दि.२५ ( प्रतिनिधी ) शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना मुंबई - ३२ तालुका शाखा आष्टी च्या संघटनेच्या पटलावर अधिकृत नोंद असलेल्या सर्व सदस्यांना प्रसारमाध्यमातून माहिती देवून दि.२५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा.पंचायत समिती सभागृह आष्टी,जि.बीड येथे तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन संघटनेचे राज्यउपाध्यक्ष महादेव सरवदे यांच्या मान्यतेने करण्यात आले होते. सदरील मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुका माजी अध्यक्ष दत्तात्रय गाडेकर हे उपस्थित होते.त्यांच्या नावाची सुचना शेषराव सानप यांनी केली तर अनुमोदन अविनाश कोकाटे यांनी दिले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे आष्टी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब काळे,सचिव विष्णू नेहरकर,सुशिक्षित बेरोजगार दिव्यांगांचे मार्गदर्शक तथा पत्रकार आण्णासाहेब साबळे,दिव्यांग कल्याण सेवा संस्थेचे संस्थापक सचिव राजकुमार थेटे,प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेचे आष्टी तालुकाध्यक्ष विक्रम आटोळे,दिव्यांग क्रांती संघटनेचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड हे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वानुमते आष्टी पंचायत समितीतील ग्रामसेवक,दिव्यांग कर्मचारी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न अनेक वर्षापासून सोडविणारे नवनाथ लोंढे यांची आष्टी तालुकाध्यक्षपदी तर आष्टी तालुका सचिव म्हणून दिव्यांगांच्या प्रश्नावर अनेक वर्षापासून आवाज उठविणारे व दिव्यांगांचे प्रश्न सोडविणारे शिक्षक शेषराव सानप यांची निवड करण्यात आली. तसेच कोषाध्यक्ष सय्यद सल्लाउद्दीन,उपाध्यक्ष अमोल शिंदे,शिवाजी कर्डीले,सहसचिव विष्णू गायकवाड,प्रसिद्धी प्रमुख शरद राऊत,महिला प्रतिनिधी श्रीम.सुनिता जगताप,श्रीम.कल्पना चोपडे,श्रीम.सुषमा धोंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवडी संदर्भात संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी त्यांना नियुक्ती पत्र सन्मानपूर्वक प्रदान केले. यावेळी संघटनेच्या वतीने आजपर्यत आष्टी तालुकाध्यक्ष म्हणून आदर्श कार्य करणारे दत्तात्रय गाडेकर,पत्रकार आण्णासाहेब साबळे,भाऊसाहेब काळे,विष्णू नेहरकर,राजकुमार थेटे,विक्रम आटोळे,अशोक गायकवाड यांचा व आष्टी तालुका नुतन कार्यकारिणी पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय गाडेकर यांनी संघटनेची रुपरेषा,आजपर्यंत संघटनेने केलेल्या कार्याची दखल याबाबत सखोल मार्गदर्शन करुन अध्यक्षीय समारोप केला.तालुकास्तरीय मेळाव्याचे प्रास्तविक राजेंद्र लाड यांनी केले तर आभार नुतन तालुकाध्यक्ष नवनाथ लोंढे यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद