By : Polticalface Team ,17-08-2024
बीड : शेती करण्यास सध्याची तरुण पिढी बहुदा नकार देत आहे. अस्मानी संकट, शेती मालाला योग्य बाजारभाव न मिळणे आणि भांडवला साठी लागणारा पैसा यामुळे शेती करण्यास तरुण इच्छूक नाहीत असं असे दिसते . पण काही लोक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीत विविध प्रकारचे प्रयोग करतात . पण बीडची एक महिला शेतकरी खजूर, ड्रॅगन फ्रुट आणि सफरचंदची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेते . विशेषबाब म्हणजे बीड हा दुष्काळी जिल्हा असून देखील त्यांनी अतिशय यशस्वी रित्या शेतीचे नियोजन केलं आहे. चला तर मग जाणून घेऊ त्यांची यशोगाथा....
तीन एकर क्षेत्रात विविध पिकांची लागवड
विजया गंगाधर घुले असं या महिला शेतकऱ्याचे नाव आहे त्या बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवाशी असून . विजया घुले यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत योग्य मिश्र शेती करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सुरवातीला विजया घुले यांनी अर्धा एकर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा निर्णय घेतला. नंतर कालांतराने खजूर आणि सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय पण घेतला. विजया यांनी खजूरची 80 झाडे तर सफरचंदचे 240 झाडे लावलेली आहे. म्हणजे एकूण तीन एकर क्षेत्र हे मिश्र पिकासाठी गुंतवलेले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या तिनही पिकांमधून त्यांना भरघोस असे उत्पन्न मिळत आहे.
खजुरातून मिळाले अडीच लाखांचे उत्पन्न
सध्या खजूर पिकाचे उत्पादन सुरू झाले असून त्यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत असल्याचं विजया यांनी सांगितले. प्रत्येक झाडापासून पहिल्याच वर्षी 70 किलो ते 120 किलोपर्यंत फळे मिळाली तो बाजारपेठेत 70 ते 100 रुपये दराने विक्री केला गेला . तर किरकोळ बाजारांमध्ये 160 ते 200 रुपयां पर्यंत खजूरची विक्री केली आहे . खजूराच्या 80 झाडापासून पहिल्याच वर्षे अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते . तर पुढील वर्षी प्रती झाड दीडशे ते पावणे दोनशे किलो पर्यंत खजूर मिळणे अपेक्षित आहे.
पुढील वर्षी दहा लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा
पुढच्या वर्षी तीन एकर क्षेत्रामधून कमीत कमी 20 ते 25 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ड्रॅगन फ्रूटचे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न तसेच खजूरचे चार ते पाच लाख रुपये उत्पन्न असे एकाच एकरामध्ये कमीत कमी दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा त्यांना आहे.
जिजामाता कृषी भूषण पुरस्काराने सन्मान
राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांनी मिश्र शेतीकडे वळले तर त्यांनाही शाश्वत उत्पन्नाचा मार्ग मिळेल. अतिशय कमी कष्टात कसलाही रासायनिक स्प्रे चा वापर न करता येणारी ही शेती असल्यामुळे ते भविष्यात नेहमीच फायद्याची ठरली जाऊ शकते . विजया घुले यांच्या यशस्वी प्रयोगाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 2022 - 23 चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार देऊन विजया घुले यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक