By : Polticalface Team ,Wed Dec 29 2021 09:42:45 GMT+0530 (India Standard Time)
(बीड प्रतिनिधी)बीड तालुक्यातील साञा पोञा,चांदेगाव,अंधापुरी,पालसिंगन या नदीपात्रात वाळुतस्करांचा नगांनाच सुरू असुन राञीच्या वेळी जिसीबीच्या सहाय्याने उपशा करून टिपरने व ट्रेक्टरने वाहतुक केली जात असुन याकडे माञ संबधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळुतस्करानी नगांनाच चालविला असताना जिल्हाप्रशासन व महसुल प्रशासन झोपा काढतय का ? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक( बाबा) कुचेकर यांनी केला आहे .
वाळुतस्करानी फुकटची वाळु उपसून स्वताचे उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटा लावला आहे तरी सुध्दा महसूल प्रशासन मुग गिळुन गप्प का ? असा प्रश्न देखील पडला आहे
साञा पोञा ,अंधापुरी,चांदेगाव, नदीपात्रात नेहमीच वाळुतस्करानी आपले दुकान थाटले असुन जिसीबीच्या सहाय्याने बेसुमार वाळु उपशा अंधारया राञी करून ट्रेक्टरने व टिपरने वाहतुक केली जात असुन संपुर्ण नदीपात्रात जागोजागी खड्डे पडल्याने एखादी जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
महसुल विभागाच्या कर्मचारयाना राञीचा होणारा अवैध वाळु उपशा लक्ष्मी दर्शनाने होत असल्याचे बोलले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख विवेक (बाबा) कुचेकर यांनी केला आहे.
वाचक क्रमांक :