यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

By : Polticalface Team ,07-09-2024

यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सोनसाखळी चोरांच्या. यवत पोलीसांनी आवळल्या मुसक्या. आरोपी जेरबंद गुन्हे शोध पथकाची कारवाई.

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड दौंड ता ०७/०९/२०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल वरून किमती सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओढून पळविल्या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता हि घटना दि १५ ऑगस्ट रोजी घडली होती. या बाबत अधिक माहिती अशी की सदरच्या गुन्हयातील फिर्यादी नामे राणी नितीन यादव रा यवत ता. दौंड, जि. पुणे. या दिराचे लग्न असल्याने मुलीला घेऊन यवत ते राहु येथे स्कुटी वरून. घेवुन जात असताना. मौजे बागवस्ती या ठिकाणी फिर्यादी यांचे मागुन एक भगव्या रंगाची गाडी वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे गळयातील साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किमत १ लाख ५७ हजार ५०० रुपये किंमतीच्या वस्तू जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेले होते. त्या बाबत यवत पोलीस स्टेशन येथे दि १५/०८/२०२४ रोजी गु.र.न. ८१५/२०२४ भा. न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा यवत पोलीस तपास करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत पोलिसांना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नामे (१) सिंदबाद जैन पवार वय ३० वर्षे, (२) गणेश भारत पवार. वय २४ वर्षे, दोघे रा.वाखारी, ता दौंड, जि पुणे यांने केल्याची माहीती मिळाल्याने. यवत पोलिसांनी त्यांना चौफुला येथुन ताब्यात घेवुन. सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हयाची कबुली दिली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली आहे. आरोपीतांनी दिनांक ०६/०३/२०२४ रोजी यवत गावचे हद्दीत श्रेयश हॉटेल च्या अलिकडे रामदास भाऊसाहेब शेंडग रा. उंडवडी, ता दौंड, जि पुणे. यांच्या गळयातील सोन्याची चैन व अंगठी असे किमती वस्तू जबरदस्तीने घेवुन पळाले होते. सदर आरोपी कडुन दोन्ही गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे गंठण, सोन्याची चैन व मोटार सायकल असा एकुण २ लाख ६७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सदरची कार्यवाही मा.श्री.पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.मा.श्री. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, मा.श्री. आण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी दौड उपविभाग दौड, मा.श्री. बापुराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग दौड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि महेश माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक, संजय देवकाते, पोलीस हवालदार. गुरूनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, पोलीस हवालदार. रामदास जगताप, पोलीस हवालदार. महेंद्र चांदणे, पोलीस कॉस्टेबल. मारूती बाराते, पोलीस कॉस्टेबल. मोहन भानवसे यांचे पथकाने केलेली आहे.

वरवंड येथील बंद खोलीत 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा गुटखा जप्त. यवत पोलिसांची जबरी कामगिरी.

नागवडे कारखान्याच्या संचालकपदी प्रवीण लबडे यांची निवड

श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या महिला तालुकाध्यक्षपदी सौ. रेखा मनोहर मोरे यांची निवड

बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची चव्हाण इको पार्क येथील रस्ता तात्काळ करावा

बारामतीच्या उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही ; सुप्रिया सुळे

वयोश्री आणि एडीप योजनेत तोंडे बघून केंद्राकडून होतेय निधी वाटप - सुप्रिया सुळेंचा आरोप

सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन युवा आघाडी आयोजित निषेध आंदोलन

गणपती विसर्जन मिरवणूक. 26 डीजे चालक मालकांना 168 अंन्वेय नोटीस. नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई दौंड पोलिसांचा इशारा.

करमाळा शहरात 39 वर्षाची परंपरा कायम ठेवत सकल मुस्लिम समाज च्या वतीने याही वर्षी गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा महादजी शिंदे विद्यालयाचे जिल्हास्तरीय परीक्षण !

न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात हिंदी दिन साजरा.

राणी बनकर बनल्या मढेवडगावच्या होम मिनिस्टर शिवशक्ती युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शिवाजी नगर सेशन कोर्टाचा निर्णय. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा. प्रतेकी १० लाख रुपये दंड न भरल्यास एक वर्ष संत्त मजुरी ची शिक्षा.

विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाला अवघ्या 25 जागांवर समाधान मानावे लागणार

श्री हनुमान तरुण मित्र मंडळ व केंद्र ग्रुप मित्र मंडळाचा उपक्रम. श्री गणेश फेस्टिवल. लय भारी महाहोम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ कांचन कुल यांच्या हस्ते.

निक्की बीग बॉसने प्लांट केलेली व्यक्ती असू शकते?

शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती वादळी सहविचार सभा

तालुकास्तरीय कबड्डी संघात व्यंकनाथ विद्यालयाला प्रथम क्रमांक

एंजल्स स्कूल बेलवंडी येथे गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ग्रामीण भागातील विद्यार्थी सुध्दा स्पर्धा स्पर्धेत पाठीमागे नाहीत -भगवानराव पाचपुते