यवत पोलीस स्टेशन हद्दीतील 75 आर शेत जमीन विक्री पोटी घेतले 22 लाख. इसार पावती व कुल मुखत्यारपत्र करुन देण्यास टाळाटाळ. अखेर गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,09-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौड ता ०९ सप्टेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे केडगाव ता दौंड जिल्हा पुणे येथील गट नंबर 93 (भोगवटा वर्ग २ क्षेत्र ) 75 आर शेत जमीनीचे वेगवेगळ्या तीन लोकांना ढगण्याचा प्रकार. अखेर जमिन मालकावर गुन्हा दाखल.
फिर्यादी श्री रोहित चंद्रकांत गजरमल, वय 31 वर्षे रा केडगाव ता. दौड. जि.पुणे यांनी दि 04/09/2024 रोजी यवत पोलीस स्टेशन अंकीत केडगाव पोलीस चैकी येथे. इसम नामे १) मनोहर हिरामण कांबळे रा केडगाव ता. दौड, जि. पुणे. यांचे विरुध्द गु र नंबर 884/2024 भारतीय न्याय संहीता कलम 316 (2), 318 (4) अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की. दि.06/06/2024 रोजी फिर्यादीचे वडील चंद्रकांत विठ्ठल गजरमल हे त्यांच्या घरी असताना येथे सौ तनुजा मनोहर कांबळे आल्या व त्यांनी सांगितले की, माझे पती मनोहर हिरामण कांबळे. यांनी आमची मौजे केडगाव ता. दौड. जि. पुणे गावचे हद्दीत ( भोगवटा वर्ग २ ) शेत जमीन गट नंबर 93 मधील क्षेत्र 48 आर पोट खराबा 27 आर असे एकूण 75 आर शेत जमीन. ही गणेश बोरकर रा कुरूळी ता शिरूर जि. पुणे यांना 5 लाख रूपये घेवुन दि.19/12/2023 रोजी केडगाव येथे विसार पावती करून दिली. गणेश बोरकर यांनी अधिक माहितीसाठी सर्च रिपोर्ट काढून चौकशी केली असता
नंतर समजले. की या अगोदर मनोहर कांबळे यांनी सदरची शेत जमीन ही बिनताबा साठेखत करून दिलेली आहे.
तरी देखील तो शेत जमीनीचे साठेखत करून मागत आहे.
या अगोदर केलेले बिनताबा साठेखत. है रामचंद्र गरदडे व कुलमुखत्यारपत्र शरद सोडनवर यांना करून दिलेली आहे.
त्यांचे कुलमुखत्यारपत्र व साठेखत हे रद्द करायचे असल्याने
त्यांचेकडून या अगोदर घेतलेले रक्कम रूपये देणे असल्याने तुम्ही मला 22 लाख रूपये देवून सदरची शेत जमीन ही गणेश बोरकर यांचेही विसार पावती रद्द करून तुमच्या नावाने बिनतांबा साठेखत करून देतो. असे मनोहर कांबळे व त्यांची पत्नी तनुजा मनोहर कांबळे यांनी सांगितले असल्याचे
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रामचंद्र गरदडे यांचेकडुन या पूर्वी घेतलेली रोख रक्कम परत देवुन. साठेखत रद्द करू. तसेच शरद सोडनवर यांचे ही रोख रक्कम परत देवुन. कुलमुखत्यारपत्र रद्द करू. व तुम्हाला केडगाव दुय्यम निबंधक कार्यालयात इसार पावती कुलमुखत्यारप करून देतो. 75 आर शेत जमीनीचे एकुण रक्कम 38 लाख रूपये. ठरविण्यात आली होती. गणेश बोरकरला ही त्याच रक्कमेत शेत जमीन ठरवली होती. तुम्ही 38 लाख रुपये पैकी आता 22 लाख रूपये द्या व उर्वरीत रक्कम (भोगवटा वर्ग 2 ची ) परवानगी आले नंतर खरेदी खत करते वेळी 16 लाख रूपये द्या असे आरोपी कडून सांगण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ता 02/07/2024 रोजी माझे साठेखत व कुलमुखत्यारपत्र करणे असल्याने मी माझा मित्र संदिप दत्तात्रय परभाने, मनोहर हिरामण कांबळे, रामचंद्र किसनराव गरंदडे, शरद सोपान सोडनबर असे आम्ही केडगाव दुय्यम निबंधक
कार्यालय येथे गेलो. त्यावेळी मनोहर कांबळे हे मला म्हणाले की, पूर्वीचे साठेखत व कुलमुखत्यारपत्र रद्द करणे असल्याने व तुम्हाला साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून देणे. असल्याने इसम नाम मनोहर हिरामण कांबळे यांना त्यांचे केडगाव येथील पुणे पिपास बँकचे खाते खात्यामध्ये आर. टी. जी. एस द्वारे 17 लाख रुपये पाठविली असल्याचे नमूद करण्यात आले असून. मनोहर कांबळे यांनी सांगितल्या वरून गणेश बोरकर यांना 5 लाख रूपये रोख स्वरूपात. फिर्यादी यांचे मित्र संदिप दत्तात्रय परभाने यांचे हस्ते असे एकुण 22 लाख रूपये. दिले असल्याचे नमूद करण्यात आले आहे
मनोहर हिरामण कांबळे यांनी रामचंद्र किसनराव परवडे यांना पूर्वी करून दिलेले साठेखत दि 02/07/2024 रोजी इसार पावती दस्त नंबर 4048/2024.रद्द केले. तसेच मनोहर हिरामन कांबळे यांनी शरद सोपान सोडनवर यांना पुर्वी करून दिलेले कुलमुखत्यारपत्र दि 02/07/2024 रोजी रजिस्टर दस्त नंबर. 4049/2024. रद्द करून घेतले. फिर्यादीचे मित्र संदिप परभाने असे दोघे जण साक्षीदार म्हणून दस्तावर सह्या केलेल्या आहेत. त्यावेळी फियादीस कुलमुखत्यारपत्र करून देतो मनोहर कांबळे हा म्हणाला होता. 1) संदिप दत्तात्रय परभाने, 2) शरद सोपान सोडनवर, 3) रामचंद्र किसनराव गरदडे. हे तेथे हजर होते. परंतु दुय्यम निबंधक कार्यालय केडगाव येथील कार्यालयाची वेळ संपल्यामुळे सदरचे दस्तऐवज. मनोहर कांबळे यांनी फिर्यादीस दुस-या दिवशी दि.03/07/2024 रोजी करून देतो. असे मनोहर कांबळे यांनी सांगितले. असल्याचे नमूद करण्यात आले आहे
दि 03/07/2024 रोजी फिर्यादी व मित्र संदिप दत्तात्रय परभाने, वडील चंद्रकांत गजरमल. असे आम्ही मनोहर कांबळे यांचे केडगाव येथील राहते घरी गेलो असता त्यांची पानी तनुजा कांबळे यांनी आम्हांस सांगितले की, माझे पती मनोहर कांबळे हे कामानिमित्त बाहेर गावी गेले आहेत. तुझे साठेखत व कुलमुखत्यारपत्र माझे पती घरी आल्या नंतर दि 04/07/2024 रोजी करून देणार आहेत. असे सांगितल्याने आम्ही परत घरी निघुन गेलो.
दि. 04/07/2024 रोजी परत फिर्यादी व मित्र संदिप दत्तात्रय परभाने आम्ही. मनोहर कांबळे यांचे केडगाव येथील राहते घरी गेलो असता त्यावेळी मनोहर कांबळे हे घरीच होते. त्यांना मी म्हणालों की, आपण ता 05/07/2024 रोजी आपले ठरल्या प्रमाने साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून चेवू असे सांगितले होते. यावर ते फिर्यादीस रागात
म्हणाले की, माला सध्या अडचण आहे. तुला एवढी काय वाई झाली आहे. मी काय घर सोडुन पळुन चाललो आहे का? 1) पोपट संकर लाड, 2) अक्षय दिलीप गायकवाड, ३) प्रथमेश तानाजी गायकवाड, 4) विकास विष्णु कांबळे, असे यांचे समावेत आमची एकत्र बैठक झाली सदर बैठकीत मनोहर कांबळे यांनी साठेखल कुलमुखत्यारपत्र करून देतो असे कबुल करुन. फियादीस विश्वासात घेतले व आज रोजी पर्यंत साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून न देता फिर्यादी कडून घेतलेले आर. टी. जी.एस द्वारे 17 लाख रूपये. व मनोहर कांबळे यांचे सांगणे वरून गणेश नामदेव बोरकर यास रोख स्वरूपात दिलेले 5 लाख रूपये अशी एकूण 22 लाख रुपये घेवुन. आज रोजी पर्यंत फियादीस मौजे केडगाव ता. दौड जि. पुणे गावचे हद्दीत शेत जमीन. गट नंबर 93 मधील क्षेत्र 48 आर. पोटखराबा 27 आर असे एकुण 75 आर शेत जमीनीचे साठेखत कुलमुखत्यारपत्र करुन दिले नाही. व फियादीचे घेतलेले 22 लाख रूपये ही परत दिले नाहीत. तसेच फियादीस विश्वासात घेवुन फसवणुक केली आहे. म्हणुन इसम नामे मनोहर हिरामण कांबळे रा केडगाव ता. दौड, जि. पुणे यांचे विरुध्द तक्रार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपी मनोहर कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल अमंलदारः पोना/काळे. अमंलदार राहा फौजदार/ गाडेकर पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद