By : Polticalface Team ,13-09-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी बुद्रुक येथील संमेक जीवन प्रतिष्ठान संचलित एंजल्स स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे गणेश उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर व प्रा निसार भाई शेख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अशी माहिती प्राचार्य रायकर डी एस यांनी दिली. या आयोजित कार्यक्रमांमध्ये विविध संस्कृती स्पर्धा; संगीत खुर्ची; लिंबू चमचा; अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा निसार शेख यावेळी शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; एंजल्स जुनियर कॉलेजचा उपक्रम हा अत्यंत प्रशा़ंसनीय आहे. सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी देखील अशा विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन आपली कला अवगत करावी. विद्यालयाचा नावलौकिक वाढतो; असे सांगून प्रा. शेख यांनी सहभागी विद्यार्थी व संयोजकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यावेळी शुभेच्छा पर भाषणात म्हणाले की; विद्यार्थ्यांनी नेहमी शाळेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.
त्यातून विविध खेळांचे भरीव मार्गदर्शन मिळून चालना मिळते विद्यालयाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ सौ सुप्रिया पवार मॅडम व मार्गदर्शक श्री संग्राम पवार यांचे विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य लाभत आहे. असे कॉलेजचे प्राचार्य रायकर डी एस यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक ओहळ पी एस; प्राचार्य डी एस; प्रा सचिन लगड; गणेशोत्सव प्रमुख गायकवाड आर बी; बांदल सर; हिवाळे सर यांच्यासह सेवक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते..
वाचक क्रमांक :