By : Polticalface Team ,15-09-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना लि., च्या नैमित्तिक रिक्त असलेल्या संचालक पदी दि. १५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये प्रवीण भीमराव लबडे यांची निवड करण्यात आली.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक जानेवारी 2022 मध्ये झाली होती. सदर निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघ क्रमांक एक बेलवंडी गट क्रमांक चार मधून भीमराव पांडुरंग लबडे हे निवडून आले होते. ते संचालक मंडळात कार्यरत असताना दि 24 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाल्यामुळे सदरची जागा रिक्त झालेली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे व प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्या मान्यतेने अध्यासी अधिकारी श्री. रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १५ रोजी दुपारी झालेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये प्रवीण भिमराव लबडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे अध्यासी अधिकारी रावसाहेब खेडकर यांनी जाहीर केले.
निवडीनंतर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधा नागवडे आणि कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सदस्य व खाते प्रमुख कामगार यांनी प्रवीण लबडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बेलवंडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :