दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील कल्याण मुंबई मटका बाजार. आड्यावर पोलिसांचा छापा टाकून कारवाई. दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,23-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 23 सप्टेंबर 2024 दौंड पोलीस स्टेशन मौजे दौंड सरपंचवस्ती ता दौंड जिल्हा पुणे गावचे हद्दीत कल्याण मुंबई मटका जुगार आड्यावर दौंड पोलीसांनी छापा टाकून कारवाई केली यामध्ये मिळून आलेले आरोपी-1) भारत तात्या होले रा गोपाळवाडी ता दौड जि पुणे 2) किशोर टेकचंदानी रा.सरपंचवस्ती ता दौड जि पुणे. यांच्या विरुद्ध गु.रजि नं 680/2024 मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) अंन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत फिर्यादी -अक्षय सुनिल कुंभार पोलीस शिपाई नेमणूक दौड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण.यांनी. दि 21/09/2024 रोजी सरकार तर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असल्याचे दौंड पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या कारवाई मध्ये मिऴून आला मालाचे वर्णन खालील प्रमाणे
1) 3620/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रू दराची 3 नोटा,200 दराच्या 3 नोटा,100 रू दराच्या 12
नोटा,50 दराची 5 नोट,10 रू दराच्या 3 नोटा
2) 5.00/- रू एक निळया रंगाचा बॉल पेन अं.कि.जु.वा.की.
3)20.00 /-रू 6 स्लिपबुक त्यावर मटका व जुगाराचे आकडे लिहिलीले अं.कि.जु.वा.की वरील प्रमाणे माल मिळून आला तो पोलीस हवा. अमिर शेख यांचे व पंचांचे सह्यांची कागदी लेबले व लाखी सीली जागीच केली छापा टाकली ती वेळ 14.20 वा असल्याचे नमूद करण्यात आले आहे
ता.21/09/2024 रोजी 14.20 वा. चे सुमारास मौजे दौड सरपंचवस्ती,ता.दौंड,जि.पुणे गावचे हद्दीत शिंदे किराणा स्टोअर्स शेजारी इसम नामे 1) भारत तात्या होले रा गोपाळवाडी ता दौड जि पुणे यांनी आपले कब्जात बेकायदा बिगर परवाना कल्याण मटका नावाची जुगाराची साधने व रोख रक्कम 3.645 /- रू असा एकुण 3645/-रू माल जवळ बाळगून आपले ओळखीचे लोकांकडून पैसे घेउन त्यांना जुगार खेळवीत असताना मिळून आला तसेच सदरचा मटका किशोर टेकचंदानी रा.सरपंचवस्ती ता दौड जि पुणे यांचे सांगणे वरून घेतो म्हणून माझी त्यांचे विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी -सपोनि/राठोड पुढील तपास पो.ना/रोटे करीत आहेत
वाचक क्रमांक :