तुमच्याकडून मतदानाची माहीती हावी आहे. असे सांगून शेतमजूर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोर गेला पळून.
By : Polticalface Team ,24-09-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता 24 सप्टेंबर 2024 दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे
देऊळगाव राजे ता. दौंड जि पुणे. येथील शेतामध्ये काम करत असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र हिसकावून अज्ञात चोरट्या पळून गेला हि घटना -दि 21/09/2024 रोजी दुपारी २ वाजे सुमारास घडली असून या घटने बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे. फिर्यादी- राणी मल्हारी बडगे. वय-40 वर्षे,व्यवसाय - शेत मजुर रा. देऊळगावराजे ता. दौंड जि पुणे. यांच्या फिर्यादी वरून गु.रजि नं 681/2024 बी.एन.एस 304 (2) अंन्वेय अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की दि 21/09/2024 रोजी सकाळी 10.00 वा.चे सुमारास फिर्यादी शेत मजूर महिला गावातील प्रमोद सुभाष काळे यांच्या देऊळगावराजे येथील शेत जमीन गट नं 394 मध्ये शेत मजुरीच्या कामा करीता गेली होती. त्यावेळी फिर्यादी सोबत मुक्ताबाई लहु जाधव रा. देऊळगावराजे या महिला देखील होत्या. दोघीचे शेतातील कामे झाल्या नतंर दुपारी 2.00 वा.चे सुमारास जेवन करण्यासाठी शेताजवळ असलेल्या किसन गुलाबराव काळे यांच्या वखारी मध्ये जेवणासाठी दोन्ही महिला बसल्या होत्या त्यावेळी एक काळ्या रंगाचा व अंगात निळसर रंगाचा शर्ट व नेसणीस पांढऱ्या रंगाची पँण्ट घातलेला अंदाजे 40 वय वर्षाचा एक इसम त्यांच्या जवळ येऊन. फिर्यादी व मुक्ताबाई यांना. म्हणाला मला तुमच्या कडून मतदानाची माहीती हावी आहे. असे म्हणून मजुर महिलांना त्यांची माहिती विचारू लागला. त्यावेळी फियादीने शेतमालक प्रमोद सुभाष काळे यांना फोन करून सांगितले की, सदर इसम हा मतदानाची माहिती विचारत आहे तुम्ही त्या व्यक्तीशी बोला. त्यांच्याशी सदर इसम यांचे बोलणे झाल्या. थोडा वेळ थांबून अचानक फियादी व त्यांच्या सोबत असलेल्या मुक्ताबाई या दोन्ही महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मणी मगळसुत्र खेचून पळ काढला त्यांने शेता पासून लांब अंतरावर लावलेल्या त्याच्या मोटर सायकल जवळ गेला त्या नतंर पुन्हा मुक्ताबाई यांच्याकडे येवून त्याच्या कानातील सोन्याचे कर्णफुले मागू लागला. त्यावेळी मुक्ताबाई हिने मोठ मोठ्याने आरडा ओरड केल्याने अज्ञात चोराने तेथून पळ काढुन शेता पासून लांब लावलेली मोटर सायकल वर बसून पळून गेला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिनेचे वर्णन खालील प्रमाणे.
1)25,000/-रू किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र जु.वा.किं.अं 2)25,000/-रू किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसुत्र जु.वा.किं.अं एकुण 50 हजार रू किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांने चोरून नेले असून
सदर अज्ञात चोर मिळून आल्यास फिर्यादी ओळखल्या शिवाय राहणार नाही असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दौंड पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अधिकारी सपोनि/राठोड सो. पुढील तपास -पो.स.ई/उगले करीत आहेत.
वाचक क्रमांक :