By : Polticalface Team ,06-10-2024
लिंपणगाव( प्रतिनिधी)-- श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या नळ योजनेची पाईपलाईन महावितरणच्या ठेकेदाराकडून जागोजागी उध्वस्त केल्यामुळे लिंपणगावचा गेल्या दहा ते बारा दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अशी माहिती लिंपणगाव चे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अरविंद कुरुमकर यांनी दिली. अधिक माहिती देताना श्री कुरुमकर यावेळी म्हणाले की; गेल्या पंचवीस दिवसापासून महावितरण कंपनीने ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता सिंगल फेजचे पोल परस्पर नळ योजनेच्या पाईपलाईन वर खोदून पाईपलाईनची मोडतोड केल्याने गावचा गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. असे सांगून श्री अरविंद कुरुमकर आणखी पुढे म्हणाले की महावितरण ने गाव परिसरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या जुन्या जीर्णतारा तोडून गाव परिसरात केबल द्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. जुन्यात जीर्णतारा देखील संबंधित ठेकेदारांनी ताब्यात घेऊन परस्पर विल्हेवाट लावल्याचे श्री कुरुमकर यांनी म्हटले आहे. त्याचीही चौकशी झाली पाहिजे ग्रामपंचायतला कुठल्याही प्रकारची कल्पना न देता संबंधित ठेकेदार यांनी गावच्या नळ योजनेच्या पाईपलाईन वर अनेक ठिकाणी विद्युत पोल बसवून गावच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा केल्याने ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे देखील कुरुमकर यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीने श्रीगोंदा तालुक्यात ग्रामीण भागांमध्ये वीज चोरीला आळा बसण्यासाठी जुन्या जीर्ण तारा काढून नवीन सिमेंट पोल बसून केबल द्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. परंतु महावितरण कंपनीने ग्रामपंचायतला विचारणा न करता परस्पर विद्युत पोल बसवून ग्रामपंचायतीच्या नळ योजना पाईपलाईनची मोठ्या प्रमाणावर मोड तोड केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव येथे गेल्या पंधरा दिवसापासून सिमेंट पोल बसवताना नळ योजनेच्या पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात मोडतोड करून नुकसान केले आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी देखील या प्रश्न महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची आवश्यकता होती. परंतु कुठल्याही प्रकारची विचारणा संबंधित ठेकेदाराला केलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात महावितरणच्या ठेकेदाराने नळ योजनेची पाईपलाईन जागोजागी तोडल्याने गेल्या दहा-बारा दिवसापासून गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐन सणासुदीच्या कालावधीत ग्रामस्थ व महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येऊन ठेपली आहे. या प्रकरणाला गावचे ग्रामविकास अधिकारी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. मुळात ग्रामसेवकच या प्रकरणाला जबाबदार असल्याचे अरविंद कुरुमकर यांनी आरोप केला आहे. मोठ्या लोकसंख्येचे गाव असताना ग्रामसेवक केव्हा? येतात आणि केव्हा जातात? हे देखील ग्रामस्थ सदस्यांना देखील माहित नसते. या प्रश्न गटविकास अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता असल्याचे श्री कुरुमकर यांचे म्हणणे आहे गावच्या नळ योजनेचा खेळ खंडोबा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाल्याचे अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे या प्रश्न श्रीगोंदा च्या गटविकास अधिकाऱ्यां कडे तक्रार दाखल करून संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छडावे लागेल; असा इशारा देखील माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
गावच्या जलजीवन चे तीन तेरा
यावेळी अधिक माहिती देताना अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे की; लिंपणगाव ग्रामपंचायतला जलजीवन योजनेसाठी साडेचार कोटी रुपये उपलब्ध झाले. परंतु लिंपणगावात मात्र या योजनेचे कामच झालेच नाही; मग हे साडेचार कोटी रुपये नेमके कुठे? खर्चे घातले? याचाही हिशोब ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलवून ग्रामसभेत माहिती सांगावी. या प्रश्न आम्ही गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना जाब विचारणार असल्याचे अरविंद कुरुमकर यांनी म्हटले आहे.
वाचक क्रमांक :