तरुण व्यावसायिक अमोल साळुंखे यांच्या खून प्रकरणी व्यावसायिक साथीदार महेश काळे याला बारा तासाच्या आत ठोकल्या दौंड पोलिसांनी बेड्या
By : Polticalface Team ,11-10-2024
दौंड (प्रतिनिधी) 10 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री बोरावके नगर लिंगाळी रोडवर अशोक नगर या ठिकाणी रात्री 9 ते 11 यांच्या दरम्यान मयत अमोल सुभाष साळुंखे राहणार लिंगाळी त्याच्यावर हल्ला करून खून केला होता, लागली त्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली आणि गतीने तपास यंत्रणा कामाला लागली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस तसेच दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी मयत अमोल साळुंखे यांचा व्यवसाय पार्टनर महेश गणेश काळे याने पैशासाठी खून केल्याचे कबूल केले आणि दौंड पोलिसांनी बारा तासात त्याला अटक करून एक धडाडीचे काम केले, याबाबत सविस्तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती दिली, गतीने तपास केल्याबद्दल दौंड पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे,
वाचक क्रमांक :