यवत सह दौंड उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी घरफोडी सारखे २० गुन्हे. करणारी टोळी जेरबंद १० तोळे सोन्याचे दागिने सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
By : Polticalface Team ,14-10-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १४ ऑक्टोबर २०२४ यवत सह दौंड उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे २० गुन्हे करणारी टोळी. यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी जेरबंद केली असून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने,व मोटारसायकल सह सुमारे ८ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की दि.०४ ऑक्टोंबर रोजी रात्री ०९.३० च्या सुमारास कानगाव हद्दीतील रेल्वे पुलाजवळ काही जण दुचाकीसह हत्यार बंद दरोडा घालण्याचे तयारीत असल्याची माहिती यवत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे. यवत पोलीस पथक सदर ठिकाणी गेले असता चोरट्यांनी दोन्ही मोटार सायकलला आग लावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. असता या पैकी आरोपी १) सिध्दू रसिकलाल चव्हाण याला लोखंडी कोयत्या सह ताब्यात घेऊन चौकशी केली असता. २)दिपक रसिकलाल चव्हाण (रा.इनामगाव ता. शिरूर) ३)बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर), ४) प्रशांत फोटया उर्फ बंडू काळे (रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) ५) हनुमंत फोटया उर्फ बंडू काळे ( रा. राक्षसवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर ) हे साथीदार असल्याचे सांगितले. या वेळी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेतला असता या पैकी बाबुशा गुलाब काळे याला दौंड पोलीस स्टेशन हद्दीत ताब्यात घेऊन चौकशी केली असता सर्व जण कानगाव येथे दरोडा टाकण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. १)सिध्दू रसिकलाल चव्हाण ( वय १९ रा. इनामगाव तालुका शिरूर) व ३) बाबुशा गुलाब काळे (वय २१ रा. शेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या दोघांना अटक करून अधिक चौकशी केली असता यवत, दौंड व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोड्या, दरोडा, जबरी चोऱ्या असे एकुण २० गुन्हे उघडकीस आले असून कबुली दिली आहे. यामध्ये यवत पोलीस स्टेशन हद्दीतील १७ गुन्हे. दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील २ गुन्हे व उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील १ गुन्ह्यांचा समावेश असून सदर आरोपींन कडून गुन्हातील चोरी केलेले सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन मोटारसायकल सह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली सहा.पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सहाय्यक फौजदार महेंद्र फणसे, पोलीस हवालदार कानिफनाथ पानसरे, हिरालाल खोमणे. गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अक्षय यादव, रामदास जगताप, विकास कापरे, पोलीस कॉन्स्टेबल मारूती बाराते, गणेश मुटेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, योगेश नागरगोजे, विजय कांचन, राजु मोमीण, पोलीस हवालदार शेख यांच्या पथकाने केली असून सदर ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख करीत आहेत.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद