By : Polticalface Team ,23-10-2024
प्रतिनिधी : पुण्यात काल 5 कोटींच्या नोटा सापडल्यानंतर आज आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं, हडपसर पोलिसांची मोठी कारवाई
पुण्यात आणखी एका कारमध्ये मोठी रोकड सापडली आहे. दरम्यान, मोठी रक्कम सापडल्यानंतर पोलिसांनी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला माहिती दिली: पुण्यात सोमवारी (दि.22) एका बड्या नेत्याच्या कारमध्ये 5 कोटींच्या नोटा सापडल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एका कारमध्ये मोठं घबाड सापडलं आहे. पुण्यातील हडपसर पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. नाकाबंदीच्या वेळेस आज (दि.22) संध्याकाळी पोलिसांना एका गाडीत तब्बल 22 लाख 90 हजार रुपये रोकड सापडली आहे. दौंड होऊन पुणे मार्केट यार्ड या ठिकाणी गाडी जात होती. पोलिसांनी या गाडीची झडती घेतली असता 22 लाख 90 हजार रुपये रोकड या गाडीत आढळून आले आहेत. पोलिसांनी विचारपूस केली असता हा एक व्यापारी असल्याचे समजले आहे. कामानिमित्ताने तो मार्केट यार्ड या ठिकाणी चाललोय, असं व्यापाऱ्याने सांगितलं.
*पोलिसांकडून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला पाचारण*
दरम्यान, या रकमेबद्दल कुठलंही समाधानकारक उत्तर या व्यापाऱ्याकडून मिळालेला नाही. या 22 लाख 90 हजार रुपयांबद्दलची कुठली स्पष्टता पोलिसांना मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भातील माहिती आयकर विभाग आणि इलेक्शन कमिशन यांना दिले आहे. पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असताना आणि आचारसंहिता लागू झालेली असताना कारमध्ये पैसे सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
*रोहित पवारांचे गंभीर आरोप*
सहा ते सात गाड्या होत्या, हा विषय नवीन असताना दुसरी माहिती समोर येते. पैशाचा इतक्या मोठ्या प्रमाणात वापर हे सरकार करणार आहे. लोक पैशाला नाकारातील. महायुतीमध्ये असलेल्या एका नेत्यांची अडचण दुसरा नेता करतो, की काय अस वाटतंय. लोकांसमोर सत्य येतंय की हे पैसे वाटणार आहे. अजून 30 दिवस जायचे आहेत. लोकसभेत त्यांनी पैसे वाटले पण जनतेने पैशाला नाही तर महाविकास आघाडी सरकारला प्राधान्य दिले. महायुतीचा विश्वास लोकांवर राहिलेला नाही म्हणून ते पैसे वाटतात.
वाचक क्रमांक :