पवार साहेबांच्या बाजूला जो उभा तोच आमचा दादा; बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

By : Polticalface Team ,02-11-2024

पवार साहेबांच्या बाजूला जो उभा तोच आमचा दादा; बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

बारामती:जनआधार न्युज भिमसेन जाधव गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीमध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या पवार घराण्याच्या दिवाळी पाडव्याच्या सोहळ्यात यंदा दुभंग दिसत आहे. बारामतीमध्ये यंदा शरद पवार  आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. दिवाळी पाडव्याचे पारंपरिक ठिकाण असलेल्या बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी शरद पवारांशी निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांनी  अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोले लगावले. फांद्या छाटल्या गेल्या तरी मूळ हे मूळ असतं, अशी भावना शरद पवारांना भेटण्यासाठी आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याने व्यक्त केली. 

यावेळी शरद पवार गटाचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मेहबुब शेख यांनी 

एबीपी माझाशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, आम्ही दरवर्षी पवार साहेबांना पाडव्याला शुभेच्छा द्यायला येतो. त्यांना भेटून आम्हाला नवी प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. दिवाळी पाडव्याला मी शरद पवारांना भेटायला येण्याचं यंदाचं 17 वं वर्ष आहे. कोरोनात पण मी त्यांना भेटायला आलो होतो, पण तेव्हा सुप्रिया सुळे यांना भेटून माघारी गेलो होतो. पण दरवर्षी पाडव्याला पवार साहेबांना भेटायचे, हे आमच्या मनात कायम असते, असे मेहबुब शेख यांनी म्हटले. 

 *अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला* 

 

गोविंद बागेत खूप गर्दी होते, म्हणून मी काटेवाडीत पाडवा मेळावा आयोजित केला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याविषयी विचारले असता मेहबुब शेख यांनी म्हटले की, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. पण दोन पाडवे करायची वेळ का आली, हे समस्त महाराष्ट्राला माहिती आहे. पवार साहेबांच्या बाजूला जे उभे आहेत, तेच आमच्यासाठी ताई आणि दादा आहेत. शरद पवार यांच्यासोबत असताना अजित पवारांचं चांगलं सुरु होतं. पण आता तशी परिस्थिती नाही. ही गोष्ट अजित पवार यांनाही समजली आहे. पण आता वेळ निघून गेल्याचे मेहबुब शेख यांनी म्हटले.


 *हे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचं यश आहे: सुप्रिया सुळे* 

बारामतीमध्ये गोविंदबाग आणि काटेवाडी येथे होत असलेले दोन दिवाळी पाडवे हे दिल्लीतील अदृश्य शक्तीचे यश आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ही महाशक्ती घर आणि पक्ष फोडते, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. 

 *कार्यकर्त्याने दादांसाठी सोन्याची मिठाई आणली* 


अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी सोन्याची मिठाई दादांचं तोंड गोड करण्यासाठी आणली आहे. अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामती मध्ये येतात अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आणि आम्ही अजितदादांसोबतच आहोत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

एम.जे.एस. कॉलेजचा बॉडी बिल्डर गणेश भोस याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड

श्री छत्रपती शिवाजी महविद्यालयातील डॉ.संदिप कदम यांची प्राध्यापकपदी पदोन्नती

Success Story: अपयशातून यशाचा प्रवास: परीक्षेत नापास झाल्यानंतर टोमणे सहन करत ३५० कोटींचा व्यवसाय उभा केला

परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेचे पडसाद दौंड तालुक्यात. पाटस पोलिस ठाण्यात भिम सैनिकांनी दिले निषेधार्थ निवेदन.

एम.जे.एस. कॉलेजच्या खेळाडूंची विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

राज्यातील महाविकास आघाडीने आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडू नये. भाजपचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ठोंबरे

मधुकर सुपेकर यांना गुणवंत मुख्याधापक पुरस्कार प्रदान

पुरावे असतानाही केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूच्या तपासात दिरंगाई केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचे करमाळा पोलीसांवर ताशेरे....

शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन

पत्नीला प्रोत्साहित करणारा अवलिया, पत्नीने सासर माहेरच्या सहवासातून करून दाखवली किमया

लिंपणगाव ते मुंढेकरवाडी महादेव मंदिरापर्यंत मंजूर रस्त्याचे काम प्रलंबित; रस्त्याच्या कामाला गती द्या; मुंढेकरवाडीच्या ग्रामस्थांची मागणी

विधानसभेत आमदार ओगलेंची दमदार एंट्री शपथ घेतांनाच श्रीरामपूर जिल्ह्यासाठी वेधले लक्ष

गरीब जनतेच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यात मला आनंद वाटतो---एम. एस. शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा

दौंड तालुक्यातील मौजे कडेठाण परीसरात बिबट्याच्या भितीने नागरीक हैराण. वनविभाग प्रशासनाने हिंसक बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पाटस येथे महामानवाला विनम्र कोटी कोटी अभिवादन केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन, आंदगाव विद्यालयातील विद्यार्थीनी संविधान उद्देशिकाचे वाचन करुन केले अभिवादन.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे उपसरपंच सुभाष यादव यांनी केले अभिवादन,

अपघातात मृत्यू पावलेले आदित्य लष्करे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण ,राजेंद्र नागवडे यांच्याकडून लष्करे कुटुंबीयांचे सांत्वन

जीवनामध्ये पैशापेक्षा मित्रत्वाचे नाते अखंड ठेवा- मा. प्राचार्य आर के लगड, तब्बल वीस वर्षानंतर व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गळाभेट

कासुर्डी हद्दीत रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू. घटना स्थळी मृतबिबट्याचा पंचनामा. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे.