सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे काळाच्या पडद्याआड,हजारोंच्या उपस्थितीत कै जिजाबापू शिंदेंना भावपूर्ण श्रद्धांजली

By : Polticalface Team ,02-11-2024

सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे काळाच्या पडद्याआड,हजारोंच्या उपस्थितीत कै जिजाबापू शिंदेंना भावपूर्ण श्रद्धांजली

    लिंपणगाव (प्रतिनिधी) सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व  मढेवडगावचे सुपुत्र ज्येष्ठ नेते जिजाबापू पर्वती शिंदे वय 68 यांचे नुकतेच पुणे येथे शुक्रवारी रात्री ८.३० वाजता पुणे येथील नामांकित दवाखान्यामध्ये उपचारदरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. कै जिजाबापू शिंदे हे हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात 1984 साली नागवडे कारखान्याच्या संचालक पदापासून केली. सहकार क्षेत्रात काम करताना सभासद; कामगार; शेतकरी; कष्टकरी यांचे हिताचे निर्णय घेत या सर्वांच्या उन्नतीसाठी जिजाबापूंनी मोठे प्रेम करत सहकारात मोठे योगदान दिले. स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांनी आपले जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळीशी मोठे जिव्हाळ्याचे संबंध जोपासले. 23 व्या वर्षापासूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नागवडे कारखान्याचे संचालक ते पंचायत समिती सदस्य पदापर्यंत काम करत असताना सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी होईपर्यंत जिजाबापू  शिंदे यांनी आपली प्रतिष्ठानला लावली. अगदी संघर्षातून हे नेतृत्व तयार झाले होते. सर्वांना विश्वासात बरोबर घेऊन जाणारे हे नेतृत्व होते विशेष म्हणजे 1988--89 रोजी नागवडे कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांच्या नेतृत्वाखाली जिजाबापू शिंदे यांना नागवडे कारखान्याचे सह्यांचे अधिकार देऊन सहकार महर्षी बापूंनी जिजाबापू  शिंदे यांच्यावर सहकारी साखर कारखानदारीची धुरा सोपवली. ती जिजाबापूंनी अत्यंत चोख व सक्षमपणे सांभाळली. जिजाबापू शिंदे हे मढेवडगाव येथील रयत शिक्षण संस्थेची शाखा स्थापन झाली. त्यावेळी ते एसएससी चे पहिले विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख आहे. आपण या विद्यालयात ज्ञानदान घेतले त्याचा अभिमान समोर ठेवून जिजाबापू यांनी या रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय इमारत सुसज्ज होण्याकामी आपले भरीव असे योगदान दिले. आपल्या राजकीय जीवनामध्ये तालुक्यात इतर संस्थेवर पदाधिकारी म्हणून काम करत असताना तत्पूर्वी त्यांनी आपल्या मढेवडगाव गावच्या विकासात आदर्श असे काम केले. मोठा सहभाग नोंदवला. जिजा बापू शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी संपत्तीपेक्षा समाजसेवेला त्यांनी अधिक महत्त्व दिले. राजकारणात चढ-उतार प्रसंगी जिजाबानी अपमान अंगी ठेवला नाही. शेवटच्या श्वासापर्यंत हसतमुख राहिले. शिंदे सरकार घराण्यातील हे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिजाबापू शिंदे हे परिचित होते. 

      कै.   जिजाबापू शिंदे यांच्या सुस्वभावामुळे त्यांनी श्रीगोंदा; शिरूर; दौंड; पुणे; इंदापूर; नगर इत्यादी तालुके; शहर व गावातून देखील आपले मैत्रीपूर्ण संबंध जोपासले. राजकारण करायचे तर सरळ मार्गे समोर कोणी विरोधक असो वा कार्यकर्ता असो सर्वांशी जिजाबापू शिंदे यांनी आपले जिव्हाळ्याचे संबंध अधिक दृढ ठेवले. कै. जिजाबापू शिंदे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील अनेकांनी अंत्यविधी प्रसंगी उपस्थित राहून अश्रूनयनांनी जिजाबापूंना  अखेरचा निरोप देण्यासाठी श्रद्धांजली अर्पण केली. जिजाबापू यांच्या निधनामुळे मढेवडगावच नव्हे तर श्रीगोंदा तालुक्यातील एक जाणकार व ज्येष्ठ अभ्यासू व्यक्तिमत्वाला श्रीगोंदा तालुका मुकला असून; त्यामुळे तालुक्याची देखील मोठी हानी झाली आहे. अशा प्रतिक्रिया देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. जिजाबापू शिंदे यांच्या पश्चात पत्नी; दोन मुले; दोन मुली; दोन भाऊ; चार बहिणी; सुना नातवंडे; पुतणेअसा मोठा परिवार आहे. जिजाबापू शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. अंत्यविधी प्रसंगी जिजाबापू शिंदे यांचे पुत्र नितीन शिंदे यांनी अग्नि दिला.

       अंत्यविधी प्रसंगी आमदार बबनराव पाचपुते; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे ;ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस; माजी आमदार राहुल जगताप; ;केशवराव मगर; घनश्याम शेलार; राजेंद्र म्हस्के; अण्णासाहेब शेलार; स्मितल वाबळे; साहेबराव वाबळे; गणपतराव काकडे; लक्ष्मण नलगे; रयत  उत्तर विभागाचे विभागीय निरीक्षक नवनाथ बोडखे; मुख्याध्यापक हौसराव दांगडे लतिका वराळे; मदन फराटे; संजय लाकूडझोडे; पंडित पाटील आदींनी जिजाबापू शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक सहवासातील आठवणींना उजाळा दिला यावेळी मढेवडगाव पंचक्रोशी सह जिल्हा व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैया वाबळे यांनी केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद