विधानसभेला संधी द्या श्रीगोंदा तालुक्याचे नंदनवन करू महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे

By : Polticalface Team ,04-11-2024

विधानसभेला संधी द्या श्रीगोंदा तालुक्याचे नंदनवन करू महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- विधानसभेत जाण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्या श्रीगोंदा तालुक्याच्या वैभवात भर घालून तालुक्याचे नंदनवन करू ;अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांनी आयोजित जन आशीर्वाद यात्रेत बोलताना व्यक्त केले. 

        रविवारी 3 ऑक्टोबर रोजी लिंपणगाव; शेंडेवाडी; मुंढेकरवाडी; पवारवाडी आणि आनंदवाडी या गाव व वाड्या वस्त्यांवर महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांची जन आशीर्वाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी लिंपणगाव येथे सकाळी आठ वाजता बसस्थानकावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सौ अनुराधाताई नागवडे यांचे जल्लोषात स्वागत केले. सौ नागवडे यांनी लिंपणगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरा महाराजांचे आशीर्वाद घेत महा आरती आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. लिंपणगाव; शेंडेवाडी; मुंढेकरवाडी येथे सौ अनुराधाताई नागवडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करताना म्हणाल्या की; सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यातील सर्वसामान्यांच्या हितासाठी ६० वर्षे अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवेत घातले. सत्ता नसतानाही  श्रीगोंदा या दुष्काळी तालुक्याला पूर्वपदावर आणले. त्यामध्ये सहकारी साखर कारखानदारी लिंपणगावच्या कार्यक्षेत्रात उभी करून सर्वसामान्यांना रोजगारा बरोबरच शेतीला उज्वल भविष्य निर्माण केले. घोड -कुकडीच्या पाण्यासाठी शासन दरबारी संघर्ष करून श्रीगोंदा तालुक्याला सिंचनाची सोय केली. सहकार महर्षी बापूंच्या अथक प्रयत्नामुळेच शेती उद्योगाला सुबत्ता आली. असे सांगून सौ नागवडे आणखी पुढे म्हणाल्या की; सहकार महर्षी बापू एवढ्यावरच थांबले नाही तर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी शिक्षणाची गंगा उभी करून विद्यार्थ्यांना आपापल्या गावातच शिक्षणाची सोय केली. कृषी क्षेत्रातही बापूंनी दिशादर्शक काम केले. मग चाळीस वर्षे विद्यमान लोकप्रतिनिधींनी सत्ता उपभोगली मात्र तालुक्यात भरीव एकही विकासाचे काम केले नाही. 

      पुढे बोलताना सौ नागवडे आणखी म्हणाल्या की; विद्यमान लोकप्रतिनिधी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत एमआयडीसीची घोषणा करतात. प्रत्येक विधानसभेला एमआयडीसीची जागा दाखवतात. त्या घोषणेला तरुण वर्ग बळी पडणार नाही. चाळीस वर्ष हा प्रश्न रखडला आहे हे देखील तरुणांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तरुणांना हाती काम नसल्याने सुशिक्षित मुले वैफल्यग्रस्त झाले आहेत. श्रीगोंदा तालुक्याची कायदा व्यवस्था पाहिली तर गंभीर बाब समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 488 मुली गायब आहेत. त्यामुळे तालुक्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत असून; मी फक्त गोड बोलून शोभेची आमदार होणार नाही. तर प्रत्येक घटक व गावाचा विकास साधण्यासाठी व्हिजन आराखडा तयार असल्याचे सौ नागवडे यांनी सांगितले. 

     पुढे बोलताना नागवडे म्हणाल्या की; श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी सहकार महर्षी बापूंचा वारसा खंबीरपणे चालवण्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे मी स्वतः माझे सर्व कुटुंब नगर- श्रीगोंदा मतदार संघातील सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना आधार देण्याचे काम करत आहोत. यापुढेही करत राहणार आहोत.  या निवडणुकीत विरोधकांनी कितीही पायात पाय घालून नागवडेंना रोखण्याचा प्रयत्न केला तरी जनता मात्र सुज्ञ आहे. जनता मायबाप आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणी कितीही आडकाठी आणली तरी नागवडे कुटुंबाची नाळ ही सर्वसामान्यांची जोडलेली असल्याने चिंता करण्याची आवश्यकता नाही. काही मंडळी आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शाब्दिक वल्गना करतात. परंतु यापुढे आमच्यावर कुणी खोटे नाटे आरोप केले तर त्यांना देखील जशास तसे उत्तर देऊ प्रत्येक चौकात चौकात व्हिडिओ लावून कारनामे उघडे करू; परंतु आम्ही संस्कारी राजकारणी आहोत. समाजाला जे हवे आहे; त्यासाठी आमचा संघर्ष व लढा आहे. सर्वांना बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील यासाठी सहकार महर्षी बापूंचे स्वप्न पूर्ण करणार आहोत.. मतदारांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हावर मतदान करावे विधानसभेत उर्वरित प्रश्न मांडण्यासाठी मते द्यावी; असे आवाहन देखील सौ नागवडे यांनी यावेळी उपस्थित मतदार व कार्यकर्त्यांना केले आहे.

       या आयोजित सौ अनुराधाताई नागवडे यांच्या जन आशीर्वाद यात्रेस लिंपणगाव; मुंढेकरवाडी पवारवाडी; ;शेंडेवाडी येथील महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गाव व वाड्यावर सौ अनुराधाताई नागवडेंचे औक्षण करून जल्लोषात स्वागत केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद