दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌वतीने श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप

By : Polticalface Team ,04-11-2024

दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌वतीने श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप दिवाळी निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या ‌‌‌‌‌‌‌‌‌वतीने श्रीगोंदा तालुक्यातील पत्रकारांना मिठाई व भेटवस्तूंचे वाटप श्रीगोंदा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक सभासद संख्या असलेली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंतराव मुंढे यांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त रविवार दिनांक १/११/२०२४ रोजी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या शुभहस्ते श्रीगोंदा येथील पत्रकारांना दिवाळी सणानिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करुन पत्रकारांची दिवाळी गोड केली यावेळी नुकत्याच संपन्न झालेल्या दिक्षाभुमी ते मंत्रालय पत्रकार सवांद यात्रेच्या पुस्तिकेचे प्रकाशन व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे संपादक असलेल्या समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ आरोटे यांनी बोलताना म्हणाले की, सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठ्याचा विचार करत असल तर पत्रकार हा देखील एक मतांचा गठ्ठा असुन त्याचा मागण्याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे असल्याचे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांच्या अथवा पक्षाच्या भूमिका विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमे अत्यंत आवश्यक असतात मात्र निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी या माध्यमाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे पत्रकारांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष तशाच प्रलंबित आहेत या सर्व बाबींचा विचार करत मार्गदर्शक संजयराव भोकरे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात आदी राज्यात सुरू असून २७ हजाराहून अधिकचे सभासद असलेली एकमेव सघटना असून संघटनेच्या यतीने नुकतीच लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पत्रकार संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शासनाने देखील यांची त्वरित दखल घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना केली हे नक्कीच आपले यश असून आगामी काळात देखील संघटना पत्रकारांच्या हितासाठी असलेल्या इतर सर्व मागण्या शासनाकडून पूर्ण करून घेणार असल्याचे सांगत. या विधानसभा निवडणुकीत उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात पत्रकारांच्या मागणीचा उल्लेख करुन त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिला तर पत्रकार सदैव त्याचा सोबत राहील असे मत डॉ आरोटे यांनी व्यक्त करत उपस्थित सर्व पत्रकारांना व त्यांच्या परिवाराला मिठाई व भेटवस्तु देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दता गाडगे, जिल्हा सरचिटणीस सुरेश खोसे, ऍड सोमनाथ गोपाळे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष माधव बनसुडे, सचिव डॉ. अमोल झेंडे, उपाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे, नंदकुमार कुरूमकर, ज्ञानेश्वर येवले, सल्लागार सतिष ओहोळ, खजिनदार किशोर मचे, मिडिया अध्यक्ष अनिल तुपे, सहसचिव सोहेल शेख,संघटक अमर घोडके, कार्याध्यक्ष शफिक हवालदार, शहराध्यक्ष नितीन रोही,शहरउपाध्यक्ष सचिन शिंदे इले.मि.तालुकाउपाधयक्ष जावेद इनामदार, मार्गदर्शक श्रीरंग साळवे, दादासाहेब सोनवणे, वैभव हराळ, धनेश गुगळे,डॉ.शिवाजी पवळ, पंकज गणवीर,चंदन घोडके,राजु शेख,पीटर रणसिंग, पल्लवी शेलार यांच्या सह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिष ओहोळ सर यांनी तर प्रास्ताविक किशोर मचे यांनी केले.तालुका सचिव डॉ.अमोल झेंडे यांनी आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद