लोणी व्यंकनाथ मध्ये बिबट्याचा धुमाकूळ कायम दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक कुत्र्यांचा बळी, बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प

By : Polticalface Team ,05-11-2024

लोणी व्यंकनाथ मध्ये बिबट्याचा धुमाकूळ कायम दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक कुत्र्यांचा बळी,     बिबट्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे ठप्प लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लोणी व्यंकनाथ मध्ये गेल्या एक वर्षापासून गाव व वाड्यावर बिबट्यांनी धुमाकूळ घालत गोठ्यातील पाळीव जनावरांवर हल्ला करून मोठी दहशत माजवले आहे. या प्रश्नासंदर्भात लोणी व्यंकनाथ परिसरात बिबट्याची दहशत कायम असून शेतात काम करणारी शेतमजूर व शेतमालक शेतामध्ये काम करण्याचे धाडस करत नाही. या प्रकारामुळे शेतीची मोठी वाहतात होत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. बिबट्याच्या दहशतीमुळे शेती उद्योग ठप्प झाल्याच्या भावना लोणी व्यंकनाच्या ग्रामस्थांनी व्यक्त केले आहेत. या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी संपर्क साधूनही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजऱ्याची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे वनविभागाच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. लोणी व्यंकनाथ येथील बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास दोन दिवसांमध्ये चार शेळ्या व अनेक पाळीव कुत्र्यांचा देखील बळी घेतल्याच्या घटना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या घटने संदर्भात वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांनी जेष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्याशी बिबट्याच्या संदर्भात संपर्क साधून माहिती दिली असता पत्रकार कुरुमकर यांनी वनक्षेत्रपाल रंजना घोडके व वन कर्मचारी संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून तातडीने घडलेल्या घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना देताच. वन कर्मचारी संभाजी शिंदे हे लोणी व्यंकनाथ येथे ५ नोव्हेंबर रोजी वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांच्या वस्तीवर हजर झाले. तेथे स्वतः सामाजिक बांधिलकी समोर ठेवून ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर हे देखील उपस्थित राहिले. या पत्रकारांच्या धाडसी निर्णयामुळे शेतकऱ्यांनी पत्रकार यांना धन्यवाद दिले आहेत. श्री जठार यांच्या तुर व निंबोणीच्या झाडामध्ये हल्ला केलेल्या शेळ्या व कुत्र्यांचे काही अवशेष आढळून आले. या हल्ला केलेल्या पाळीव प्राण्यांचे अवशेषाचे वन कर्मचारी श्री शिंदे यांनी फोटो काढून वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती भगत व वनक्षेत्रपाल श्रीमती रंजना घोडके यांच्याकडे अहवाल सादर करून तातडीने सदर अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल; असे आश्वासन व न कर्मचारी श्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी व पत्रकारांना सांगितले. * चौकोनात घ्यावे:- दरम्यान शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरापासून बिबट्याचे प्रमाण लोणी व्यंकनाथ परिसरात वाढत असून रात्री अपरात्री बिबटे प्राण्यांच्या गोठ्यात व वाड्या वस्तीवर येऊन बिबटे हल्ला करीत आहेत. यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबद करण्यात यावे. तरच या परिसरात बिबट्याची दहशत कमी होईल; अन्यथा शेतमजूर; शेतीमालक लहान बालके हे सुरक्षित राहू शकतील; या घटनेची जबाबदारी देखील वनविभागाला स्वीकारावी लागेल ;अन्यथा या घटनेत केव्हाही एखाद्याचा बळी जाऊ शकतो. अशा तीव्र भावना देखील वृक्षमित्र बाळासाहेब जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.