सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

By : Polticalface Team ,07-11-2024

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष  श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही -            शिवसेना नेते खा संजय राऊत

   लिंपणगाव (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी सर्व जनतेने खंबीरपणे उभे राहून प्रचंड मताधिक्याने निवडून द्या; ४० वर्ष पुढे श्रीगोंदा तालुक्यात कमळ फुलू देणार नाही; अशी ग्वाही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी वांगदरी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधातई नागवडे यांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना दिली. 

        प्रस्ताविकपर भाषणात ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस म्हणाले की; ज्या सहकार महर्षी बापूंच्या कृपाआशीर्वादाने राहुल जगताप आमदार झाले. त्यांना नागवडे कुटुंबाचा विसर पडला. परंतु नियती त्यांना माफ करणार नाही असे सांगून भोस आणखी पुढे म्हणाले की; उमेदवारीसाठी नागवडे यांचे नाव पुढे येताच विरोधकांना धडकी भरली. परंतु अनुराधाताई नागवडे यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली. त्यामध्ये ज्या पक्षाला तिकीट मिळेल त्याचे महाविकास आघाडीने काम करायचे असा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला. असे असताना राहुल जगताप यांनी मात्र खुद्द शरद पवारांचाच शब्द पाळला नाही. आणि स्वतःची अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली. जनतेच्या दिशा भूल करण्यासाठी पवार साहेब; बापू आणि अण्णांचे फोटो बॅनरवर लावले. त्यांना शरम वाटायला हवी. मात्र लोकसभेत ज्याप्रमाणे पराभव केला त्याच पद्धतीने विधानसभेला देखील विरोधकांना खड्यासारखे बाजूला काढू. ज्यांना साखर कारखाना व स्वतःचे कुटुंब चालवता येत नाही. ते जनतेची काय प्रश्न सोडवणार आहेत असा सवाल करत भोस आणखी पुढे म्हणाले की;  आमदार पाचपुतेंनी 35 वर्षाचा हिशोब तर राहुल जगताप यांनी पाच वर्षाचा हिशोब समोर मांडावा मग जनतेला कळेल. त्यामुळे जनतेने कुठल्याही भूतथापांना बळी न पडता अनुराधाताईंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे; असे आवाहन श्री भोस यांनी यावेळी केले. 

     आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचार शुभारंभ शिवसेना नेते खा संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत वांगदरी येथील अंबिका माता मंदिरात संपन्न झाला. यावेळी नगर श्रीगोंदा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

     यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना खा संजय राऊत यावेळी म्हणाले की; शिवसेनेकडे आत्तापर्यंत ना कोणती संस्था; ना साखर कारखाना परंतु शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या वैचारिक भूमिकेतून सहकारातील अभ्यासू घराणे नागवडे कुटुंब हे आता शिवसेनेसोबत आले आहे. त्यामुळे शिवसेनेची श्रीगोंदा व नगर जिल्ह्यात ताकद वाढली आहे. असे सांगून श्री राऊत पुढे म्हणाले की; चाळीस वर्षे आमदार पाचपुतेंकडे सत्ता होती; सत्ता इतकी भोगली परंतु त्यांना आता बोलता येत नाही. हा नियतीचा खेळ आहे. नागवडे कुटुंबाने या दुष्काळी तालुक्याला सर्वांगीण विकासाच्या पूर्वपदावर आणले. सहकार; शिक्षण; सिंचन; कृषी क्षेत्र आदी क्षेत्रात नेत्रदीपक काम केले. मग नागवडे कुटुंबातील आमदार का नको? अनुराधाताईंना एकदा संधी द्या; आमदार काय? असतो. हे दाखवून देऊ; असे सांगून खा राऊत पुढे म्हणाले की; साजन पाचपुते यांची भूमिका समविचारी आहे. मागील 2019 चा नागवडे यांना  दिलेला शब्द पाळला. विधानसभेच्या तयारीचा एक वर्षापूर्वीचा शब्द शिवसेनेने साजनला पाचपुतेंना दिला होता.  परंतु नागवडे कुटुंबाने मदत केली म्हणून त्याची परतफेड म्हणून साजन पाचपुतेंनी शिवसेनेकडून अनुराधाताईंना उमेदवारीची मागणी केली.. मोठेपणा दाखवला. साजन भैय्यानी काळजी करण्याचे कारण नाही. शिवसेनाप्रमुख तुमच्या पाठीशी आहेत. असे सांगून खा राऊत आणखी पुढे म्हणाले की; बाळासाहेबांनी रिक्षावाल्याला मुख्यमंत्री केले. नागवडे कुटुंब तर अभ्यासू व विकासाभिमुख कुटुंब आहे. या कुटुंबातील अनुराधा ताईंनाआमदार करणार आहोत. असे सांगून राऊत आणखी पुढे म्हणाले की; मराठी माणसाच्या घामातून त्यागातून निर्माण झालेली शिवसेना आहे मागे हटणारी शिवसेना नाही; स्वाभिमानी सरळ माणसाचा शिवसेना पक्ष आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राहुल जगताप यांना शरद पवार साहेबांनी फोन केला. परंतु त्यांचा त्यांचा देखील फोन श्री जगताप यांनी उचलला नाही. ती व्यक्ती सर्वसामान्यांची काय काळजी घेणार. परंतु काळजी करण्याचे कोणीही कारण नाही. महाविकास आघाडीकडून शरद पवार; सुप्रियाताई सुळे; उद्धव ठाकरे; बाळासाहेब थोरात हे सर्व महाविकास आघाडीचे नेते सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेला कुठल्याही भूलथापांना बळी न पडता सौ अनुराधा नागवडे यांना प्रचंड मताने निवडून द्या; तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे खा राऊत यांनी यावेळी सांगितले. 

      यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे; सुनंदाताई पाचपुते; संतोष इथापे; मुकुंद सोनटक्के; आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

        याप्रसंगी शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यावेळी म्हणाले की; मला शिवसेनेचे तिकीट मिळणार हे निश्चित होते. परंतु माझ्या वडिलांनी दिलेल्या नागवडे कुटुंबांना शब्द दिला त्याची मी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परतफेड करीत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील खासदार लंके यांनी ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक जिंकली. त्या पद्धतीने नागवडे कुटुंबावर वेळ आली. त्यामुळे जनतेने सुद्धा नागवडे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे राहावे. स्वर्गीय सहकार महर्षी बापूंना श्रद्धांजली म्हणून सौ अनुराधा नागवडे यांना उमेदवार करायचे हा आम्ही सर्व शक्तीनिशी चंग बांधला आहे. असे सांगून पाचपुते पुढे म्हणाले की; आमच्या कुटुंबात 40 वर्ष तालुक्याची सत्ता असतानाही विकास मात्र कुठे झाला नाही. याची आम्हाला देखील लाज वाटते. श्री पाचपुते आणखी पुढे म्हणाले की; चर्चा होऊन देखील महाविकास आघाडीच्या विरोधात राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली. ते आमदार होणार नाहीतच. हे देखील मी आज सांगतो. त्यामध्ये आमदार पाचपुते यांच्या मुलांनी आईची उमेदवारी बदलली. कुटुंबात अशी परिस्थिती असेल तर तालुक्याची स्थिती काय असेल. असा मिस्कील टोला देखील आमदार पाचपुते यांना यावेळी साजन पाचपुते यांनी लगावला. आम्ही निर्मळ मनाने नागवडे कुटुंबा सोबत राहणार आहोत. स्वर्गीय बापूंनी 2014 ला राहुल जगताप साठी उपासपोटी प्रचार करून आमदार केले. त्याच नागवडेंना लक्ष करून बापूंचे बॅनरवर फोटो लावून पराभव करायचा. याची देखील लाज वाटायला हवी. मी मात्र श्रीगोंद्यात मशाल पेटवूनच दाखवणार आहे. प्रत्येकाने तन-मन-धनाने अनुराधाताई नागवडे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे; असे आवाहन देखील साजन पाचपुते यांनी केले. 

         यावेळी मार्गदर्शन करताना अनुराधाताई नागवडे म्हणाल्या की; महाविकास आघाडीचा धर्म न पळता सहकार महर्षी बापू व अण्णांचे फोटो विरोधक लावतात. माझी उमेदवारी ही अधिकृत आणि अनधिकृत उमेदवारां बरोबर असणार आहे. 50 ते 60 वर्ष सहकार महर्षी बापूंनी समाजसेवेत योगदान दिले. तोच वारसा घेऊन आम्ही नागवडे कुटुंब जनतेसमोर जात आहे. ज्यांना ग्रामपंचायत लढवता आली नाही. ते विधानसभा लढवायला निघाले. असा खोचक सवाल उपस्थित करून सौ नागवडे पुढे म्हणाल्या की; साजन भैय्या पाचपुतेंमध्ये प्रगलबता विचाराची दूरदृष्टी आहे. भावनिक होऊन पोट भरत नाही. प्रत्येकाला भुलविण्याचे काम आमदार पाचपुते व जगताप करीत आहेत. नागवडे कुटुंब हे मात्र शब्दाला जागणारे आहे. असे सांगून सौ नागवडे पुढे म्हणाल्या की; 2014 पासून मी उमेदवारीसाठी इच्छुक होते; हे दुखणे विरोधकांना आहे. परंतु आम्ही सक्षम आहोत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या हितासाठी विधानसभेत कधीच आवाज उठवला नाही. परंतु तालुक्यात सत्ता नसतानाही बापूंनी तालुक्याचा पायाभिमुख विकास घडवून आणला. लोकप्रतिनिधीकडे चाळीस वर्षे आमदार आणि पंधरा वर्षे मंत्री होते. तरी देखील विकास साधता आला नाही. आता ते नेमका कोणता विकास साधणार आहेत. असा सवाल उपस्थित करून सौ नागवडे यांनी मशाल चिन्हावर बटन दाबून मला विधानसभेत काम करण्याची संधी द्यावी; असे आवाहन केले.

           सूत्रसंचालन नागवडे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले.

          यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे; महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे; सुनंदा पाचपुते; साजन पाचपुते; दीपक शेठ नागवडे; शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे; विठ्ठलराव नागवडे; सुरेश लोखंडे; आबासाहेब कोल्हटकर यांच्यासह श्रीगोंदा नगर मतदार संघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.