महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली
By : Polticalface Team ,08-11-2024
महाविकास आघाडीच्या सौ.अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्यादरम्यान शिवसेना नेते खा.राऊत यांची तोफ कडाडली.....
पंतप्रधान,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,यांच्यावर खासदार राऊत यांची टीका...
श्रीगोंदा (प्रतिनिधी):-
गुजरातच्या २ व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे करण्यासाठी आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले आता तीच मंडळी श्रीगोंदा मतदार संघात एक अधिकृत तर एक अनधिकृत उमेदवार उभे करून सत्ता मिळवू पाहत आहेत त्यांना रोखण्यासाठी राज्यात लोकांनी महा विकास आघाडीला साथ देण्याचे ठरवले आहे तुम्ही देखील सौ. अनुराधा नागवडे यांना विजयी करून सरकार आणण्यात भाग घ्या असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तालुक्यातील वांगदरी येथे महा विकास आघाडी उमेदवार सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
अध्यक्ष स्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे होते.
आपल्या खास शैलीत भाजप आणि अपक्ष उमेदवारांवर टीका करताना खा.राऊत म्हणाले स्व.शिवाजीराव नागवडे यांनी साडे सात वर्षे आमदार असताना मतदार संघाचे रूप पालटले पण विरोधी आमदारांनी ४० वर्ष प्रश्न प्रलंबित ठेवले तर अपक्ष उमेदवाराने आमदार असताना रस्ते केले नाहीत आता ते रोड रोलर घेऊन निघाले आहेत रोड रोलर चा स्पीड सगळ्यांना ठाऊक आहे रोड रोलर रस्त्यातील खड्ड्यात अडकून पडेल .त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांना पक्ष कसा उमेदवारी देईल असा सवाल केला .
यावेळी बोलताना उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांनी भाजप आणि अपक्ष उमेदवार वर चौफेर टीका करत उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले सौ.नागवडे म्हणाल्या समोरील उमेदवाराच्या आईने माझ्यावर टीका करताना मला त्यांनी केलेली विकास कामे दिसत नाहीत कारण मी गांधारी आहे अशी टीका केली ठीक आहे मी विरोधक असल्याने गांधारीची उपमा दिली पण उन्हाळ्यात शेतीला पाणी मिळत नाही,रोजगार नाही,एमआयडीसी नाही, साकळाई उपसा सिंचन योजना झाली नाही हा जनतेचा आक्रोश आहे ते नाराजी दाखवत आहेत त्या जनतेला तुम्ही कोणती उपमा देणार? त्यांना काय उत्तरे देणार? असा सवाल केला तसेच भाजप उमेदवार स्वतः ची उमेदवारी महीला सन्मान,युवक सन्मान,साठी असल्याचे सांगत आहे तर दुसरीकडे आईला मिळालेली उमेदवारी रद्द करून स्वतः साठी घेतली हाच का तुमचा महीला सन्मान,घरात चुलत भावाला सरपंच करण्या ऐवजी सख्या भावाला उमेदवारी दिली हाच का युवकांचा सन्मान,आज भाजपला उमेदवारावर विश्वास नसल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार वर देखील लक्ष ठेवले पण हे दोन्ही उमेदवारांना जनता स्वीकारणार नाही असे सांगून अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांच्यावर टीका करताना सौ.नागवडे म्हणाल्या राज्यात जसे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष,चिन्ह एकनाथ शिंदे यांनी घेतले ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला तसाच त्रास आम्हाला जगताप यांनी दिला स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या मदतीने आमदार झाले पण कधी भेटायला आले नाही, स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या अंत्यविधीला ,दशक्रिया विधीला सर्वात उशिरा येणारी व्यक्ती म्हणजे राहुल जगताप आणि श्रध्दांजली फ्लेक्स चे बिल नागवडे कारखान्याकडे पाठवणारी व्यक्ती राहुल जगताप एवढे त्यांचे स्व.नागवडे प्रती प्रेम आणि आता अपक्ष निवडणूक लढवताना स्व.शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरत आहे हे बेगडी प्रेम कामी येणार नाही या उलट स्वतःला महा विकास आघाडी ची उमेदवारी मिळत असताना साजन पाचपुते यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आमची शिफारस केली याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस यांनी मतदार संघात महा विकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे विरोधकांनी आपले फोटो वापरले तरी जनता जागृत आहे विकास कामे कोण करू शकतो याची खात्री नागवडे रूपाने जनतेला झालेली आहे असे सांगितले.
चौकट
महा विकास आघाडी तील बंडखोर उमेदवार प्रचारात खा.शरद पवार,राहुल गांधी, स्व. शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरत आहे पण उपयोग होणार नाही त्यांनी हव तर काल परवा विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावायला पाहिजे असे संजय राऊत म्हणताच हशा पिकला.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद