सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.
By : Polticalface Team ,08-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता ०८ नोव्हेंबर २०२४. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बारामती लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षा डॉ वंदना ताई मोहिते यांच्या उपस्थितीमध्ये यवत पोलीस स्टेशन येथे आज दि ०८ नोव्हेंबर रोजी महायुतीतील नेते सदाभाऊ खोत यांनी शरद चंद्र पवार यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यवर निषेध व्यक्त करण्यात आला.
यवत येथील साईलीला हॉटेल समोर सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा डॉ वंदना ताई मोहिते. बोलताना म्हणाल्या राज्याचे गृहमंत्री यांच्या उपस्थित कोणी टिका केली जाते. असे बे जबाबदार पणे बोलणे योग्य आहे का ? गृहमंत्र्यांनी सदर घटने बाबत राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्षा डॉ वंदना मोहिते यांनी केली आहे. या प्रसंगी काँग्रेस नेते अरविंद दोरगे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता दादर. दौड पंचायत समिती माजी सदस्य कुंडलिक खुटवड. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम. यांनी आपल्या भाषणातून सदाभाऊ खोत यांचा चांगलाच समाचार घेऊन. सदाभाऊ खोत यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वर अतिशय खालच्या भाषेत टीका केल्या बद्दल. बेजबाबदार पणे वक्तव्य करणारे सदाभाऊ खोत यांच्या विरुद्ध पुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले असून. यवत पोलीस स्टेशन येथे सदर निवेदन देण्यात आले आहे. या प्रसंगी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी निवेदन स्वीकारले आहे.
या वेळी दौंड पंचायत समितीचे माजी सदस्य कुंडलिक खुटवड. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम. यवत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच सदानंद दोरगे. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर. काँग्रेस पार्टीचे अरविंद दोरगे. रोहन दोरगे. आबासाहेब दोरगे विठ्ठल दोरगे. मंगेश रायकर. शुभम दोरगे. दीपक दोरगे. स्वप्निल दोरगे. मंगेश कुल. गोठ्या यादव. सागर दोरगे. आदी यवत पंचक्रोशीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :