महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

By : Polticalface Team ,09-11-2024

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय जनआधार न्युज 24तास भिमसेन जाधव, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी अनेक दशकापासून होती. परंतु मराठीला अभिजात भाषेचा दर्जा वर्षानुवर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने दिला नाही. आता काँग्रेसला धक्का बसला आहे. मोदी यांनी हे काम कसे केले, हा प्रश्न त्यांना पडला आहे. महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार जोरदार काम करत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र पहिली पसंत राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सांगितले. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पहिली सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात वाढवण बंदराचे उद्घाटन नुकतेच मी केले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक विमानतळ करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावेळी मी काही बोललो नाही. परंतु आता ज्या दिवशी महायुती सरकारचा शपथविधी होईल, त्यानंतर राज्यसरकारसोबत आम्ही बैठक घेऊ. त्या बैठकीत वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळाचा निर्णय घेण्याबाबत चर्चा होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले *महाविकास आघाडीकडे चालकच नाही…* महाविकास आघाडीच्या गाडीत चाके नाही, ब्रेक नाही. तसेच चालकांच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात आधी सरकारला लुटले. त्यानंतर विकास कामे थांबवली. त्यांनी मेट्रोची काम रोखली. समृद्धी महामार्गाचे काम थांबवले. त्यांनी महाराष्ट्रातील विकासाची प्रत्येक योजना थांबवली. त्यानंतर राज्यात महायुतीची सरकार बनली. त्यानंतर अडीच वर्षांत विकास चौफर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विकास भरभरुन झाला आहे. आता महाराष्ट्रातील मतदारांनी लक्षात ठेवा महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. *महिलांना जास्त अधिकार दिले* महायुतीने वचननामा जाहीर केला आहे. त्यांच्या दहा वचनांची चर्चा होत आहे. जनतेच्या सूचनांमधून हा वचननामा तयार झाला आहे. महायुतीचा वचननामा विकसित भारताचा आधार बनणार आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारतासाठी आमच्या बहिणींचे जीवन चांगले बनवणे गरजेचे आहे. महिला पुढे जातील तर संपूर्ण समाज प्रगती करेल. त्यामुळे मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने महिलांना केंद्रात ठेऊन काम केले. महिलांसाठी आम्ही सर्व दरवाजे उघडले. त्यांना अधिकार दिले. महाराष्ट्राची महायुती सरकार केंद्राच्या पावलापाऊल ठेवून काम करत आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात होत आहे. काँग्रेस ही योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कोर्टात पोहचले आहे. त्यांची सत्ता आली तर सर्वप्रथम ही योजना ते बंद करतील? असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.