अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

By : Polticalface Team ,09-11-2024

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणाऱ्या लिंपणगाव ते सहकार महर्षी नागवडे कारखाना रेल्वे गेट या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. दरम्यान गेल्या तीन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानंतर रस्त्याचे खडीकरण देखील झाले. परंतु या रस्त्याचा प्रश्न पुन्हा दोन महिने दुरुस्ती पासून थांबला. त्यामध्ये शेतकऱ्यांकडून देखील दोन्ही बाजूने चर काढण्यास अडथळा व अतिक्रमण केल्याने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे मत संबंधित ठेकेदारांनी व्यक्त केले आहे. या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके यांच्याशी दोन दिवसापूर्वी सविस्तर चर्चा करून सदर रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगून त्यामध्ये साखर कारखान्यांचे गाळप हंगाम काही दिवसानंतर सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत या रस्त्यातून ऊस वाहतूक करणारी अवजड वाहने सभासद कामगारांची वर्दळ वाढणार वाढवून मोठ्या प्रमाणावर ये जा करणार आहेत. तत्पूर्वी सदर रस्ता लवकरात लवकर मजबुतीकरण व डांबरीकरण करून वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात यावा; अशा प्रकारच्या सूचना संबंधित उपाभियंता श्री होके यांना ज्येष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी केल्यानंतर श्री होके यांनी तात्काळ संबंधित ठेकेदाराला योग्य त्या सूचना देऊन गाळप हंगामापूर्वीच सदर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ताबडतोब संबंधित ठेकेदारांनी सदर नादुरुस्त रस्त्यावर कच टाकून रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी या११०० मीटर लांबीच्या अंतराच्या रस्त्यावर संबंधित ठेकेदारांनी खडीकरण केले. परंतु त्याकडे रस्ता दुरुस्ती कड तब्बल दोन महिने दुर्लक्ष केल्याने सदर रस्त्यावरील खडी पुन्हा उघडी पडली गेली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामा संदर्भात वाहतूकदार; वाहन चालक; प्रवासी यांना शंका निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जेष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री होके यांना नादुरुस्त रस्त्या संदर्भात सविस्तर चर्चा करून कामात सुधारणा करण्यात यावी. व जलद गतीने मजबुतीकरण व डांबरीकरण करून सदर रस्ता दळणवळणासाठी सुलभ करण्यात याव्यात; अशा सूचना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री कुरुमकर यांनी यावेळी केल्या. प्रसंगी याच रस्त्यावर रस्ता दुरुस्ती प्रसंगी शेतकऱ्यांकडून मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूने चर काढण्यास विरोध होत असल्याने अतिक्रमण धारक शेतकरी यांना संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची लांबी रुंदी काढून संबंधित अतिक्रमण संदर्भात शेतकऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात; असे मत संबंधित ठेकेदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. दरम्यान लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट या नादुरुस्त रस्त्याचा अनेक वर्षापासून प्रश्न पर्यंत होता. ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांनी वेळोवेळी हा रस्ता प्रसिद्धीच्या झोतात आणून प्रशासनाला जागे केले. त्यानंतर जवळपास या रस्त्यासाठी दीड कोटीच्या दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या दुरुस्त रस्त्याच्या मध्यभागी अक्षरशा दोन ते अडीच फूट खोल जागोजागी खड्डे पडल्याने खड्डा रस्त्यात की रस्ता खड्ड्यामध्ये हे रात्री वाहन चालकांना समजून येत नव्हते. त्यामध्ये या रस्ता मार्गावर साखर कारखानदारी असल्याने रस्ता भक्कम असणे गरजेचे आहे. वेळोवेळी अपघाताचे प्रमाण देखील वाढले गेले होते. आता सदर रस्ता दुरुस्त करताना दोन ते अडीच महिन्याचा विलंब लागत असल्याने साखर कारखान्याच्या गाळप हंगामात सर्वांनाच दळणवळणासाठी ये-जा करताना जिकिरीचे होणार आहे तत्पूर्वीच रस्ता दुरुस्त होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तविक पाहता सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकामा विभागाकडे यापूर्वी समाविष्ट होता. परंतु जिल्हा परिषदेकडे रस्ता दुरुस्तीसाठी निधी अपुरा येत असल्याने सदर रस्त्याचे अनेक वर्षांपासून काम रखडले गेले होते. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार कुरुमकर यांनी वेळोवेळी जिल्हा परिषद बांधकाम विभाग व श्रीगोंद्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता यांच्याशी समेट घडून सविस्तर चर्चा करून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांच्याकडे पुन्हा समाविष्ट करण्यात आल्याने सदर नादुरुस्त रस्त्याचे कामाचा तिढा सुटला गेला आहे. आता या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यासाठी निधीही मोठ्या प्रमाणात आल्याने त्या रस्त्याचे योग्य मूल्यांकन होऊन सदर रस्ता उत्तम प्रकारे मजबुतीकरण व डांबरीकरण होऊन लवकरात लवकर साखर कारखान्याच्या गाळप हंगामापूर्वी सुरळीत करण्यात यावा; अशी मागणी देखील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांच्यासह प्रवासी वाहन चालक कामगार आदींनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद