माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

By : Polticalface Team ,09-11-2024

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार श्रीगोंदा प्रतिनिधी दि.८/११/२०२४ श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवारीअर्ज मागे घेतल्यानंतर घनशाम शेलार यांनी भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले दि. ४ रोजी काँग्रेस पक्षाचे सक्षम नेतृत्व असलेले बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, रमेश चैनीथला यांचा निरोप आला आपण काँग्रेस पक्षाबरोबर थांबावं चांगल्या प्रकारची संधी दिली जाईल असा शब्द दिल्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली. २०१९ च्या विधानसभेच्या पराभवानंतर लगेच मतदार संघामध्ये सक्रिय झालो मागील पाच वर्षांमध्ये सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला श्रीगोंद्याची जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे उमेदवारी अर्ज अपक्ष भरला परंतु कुठल्यातरी पक्षाचा आधार असावा, म्हणून बच्चुभाऊ कडू यांच्याशी बोलून प्रहार कडून अर्ज भरला परंतु या निर्णयामुळे काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली. दरम्यान राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते यांचा मेळ घालून यांच्याजवळ एकत्र येण्याची भूमिका मांडली त्यांना यापुढे अनेक ठिकाणी संधी आहेत माझी ही शेवटची संधी होती परंतु या सर्व गोष्टींना यश आले नाही. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा निरोप आल्याने काँग्रेस सोबत थांबून उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला असे घनशाम शेलार यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना शेलार म्हणाले राजकीय आयुष्यात कुठेही सेटलमेंट केली नाही कोणालाही मी मिंधा न राहता निर्णय घेतला आहे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तेवढी उंची नाही. सेटलमेंट केली असे म्हणणाऱ्यांनी पुरावे द्यावेत. कार्यकर्त्यांशी बोलून महाविकास आघाडी साठी सोमवार पर्यंत भूमिका स्पष्ट करणार विधानसभेच्या रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी मी भूमिका मांडल्यानंतर बोलू नये असही शेलार म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद कर सर, वलघुड - खांडगाव चे सरपंच राम घोडके, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, बाळासाहेब शेलार, श्रीपाद दादा ख्रिस्ती, प्रकाश निंभोरे ,भिंनताडे साहेब, सुभाष दरेकर ,अमोल टकले, धनंजय औटी ,दिगंबर शिंदे ,संतोष कुदांडे ,संजय इंगळे ,मच्छिंद्र जाधव तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद