ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

By : Polticalface Team ,09-11-2024

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही ,    नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे लिंपणगाव (प्रतिनिधी):- ज्यांनी शेतकऱ्यांचे वर्षानुवर्ष ऊसाचे पैसे दिले नाही म्हणून ३० गुन्हे दाखल झाले ,शेतकऱ्यांचे वाटोळे केले ,ज्यांनी सरकारचा विकासासाठी आलेल्या पैशातून ४० टक्के कमिशन घेतल्याने कामाचा दर्जा घसरला हे ज्यांच कर्तुत्व ते आमदार म्हणून काय विकास करणार असा सवाल सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी केला. नागवडे म्हणाले निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे सहकारात आमचा कारभार नागवडे कारखाना ५० वर्षे सलग गळीत हंगाम करत आहे शिवाय उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद,पंचायत समिती,जिल्हा सहकारी बँक आदी ठिकाणी चांगले काम केले तुलनेत विरोधी उमेदवार यांचे साखर क्षेत्रात आणि तालुक्याच्या विकासात काय दिवे लावले ते सर्वांना माहीत आहे असे सांगून भाजप उमेदवाराने तर आईला मिळालेली उमेदवारी बदलण्यासाठी शेवटी उमेदवारी मिळाली नाही तर पुण्याला निघून जाईल असे वेठीस धरून उमेदवारी घेतली त्यांना जनता थारा देणार नाही ते पुण्याला जाणार होते त्यांचे स्वप्न जनताच २० तारखेला पूर्ण करणार असून जनता मुंबईला नाही तर पुण्याला नक्की पाठवणार असे सांगितले. अपक्ष उमेदवार जगताप यांच्या वर टीका करताना राजेंद्र नागवडे म्हणाले २०१४ साली आम्ही त्यांना आमदार बनवण्यात पुढाकार घेतला २०१९ मध्ये त्यांनी उमेदवारी नाकारली कारण दिले की कुकडी सहकारी साखर कारखान्याची घडी बसवायची पण प्रत्यक्षात आज कुकडी कारखाना शेतकऱ्यांचे बिल देऊ शकत नाही शेतकरी चकरा मारत आहे अशा व्यक्तीला खासदार शरद पवार कशी उमेदवार देणार कारण २०१४ साली याच मुद्द्यावर लोकांनी पाचपुते यांना नाकारले होते हे खा.शरद पवार यांना माहीत आहे अशी टीका करत नागवडे म्हणाले जगताप हे स्व.शिवाजीराव नागवडे यांचा फोटो वापरता त्यांनी नागवडे यांचा कारखाना कारभार पहावा ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे कधीच थकवले नाही ,ज्यांच्या कुटुंबातील कोणीही जगताप यांच्या बरोबर नाही त्यांचा फोटो वापरण्याचा जगताप यांना अधिकार नाही तसेच महा विकास आघाडी उमेदवार सौ.अनुराधा नागवडे यांना आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे समर्थन असताना जगताप यांनी खासदार शरद पवार आणि खासदार राहुल गांधी यांचा फोटो वरून दिशाभूल चालवली आहे पण जनता थारा देणार नाही
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद