हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

By : Polticalface Team ,10-11-2024

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

कोळगाव: परिसरातील मोठे नेतृत्व असलेल्या हेमंत नलगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या सोबत प्रचार प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने नागवडे यांना पाठबळ मिळून जगताप यांना थेट धक्का बसला आहे. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कोळगाव मध्ये पाचपुते, नागवडे व जगताप यांचे सारखेच प्राबल्य आहे. कोळगाव मध्ये दहा हजाराच्या आसपास मतदान असल्याने सर्व राजकीय नेत्यांचा कोळगाव मधील मतदारांना आकर्षित करण्याकरता नेहमीच ओढा असतो. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच पाचपुते, नागवडे व जगताप आमने सामने उभे राहिल्याने नागवडे व जगताप यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्या नेत्यांचे काम करावे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेमंत नलगे यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने कार्यकर्ते संभ्रमाअवस्थेत होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जगताप व नागवडे यांनी हेमंत नलगे आणि सरपंच पुरुषोत्तम लगड या दोन्ही गटांना मदत केल्याचे बोलले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता हातची गेल्याने हेमंत नलगे हे या दोन्ही नेत्यांवर नाराज असल्याचे जाणवत होते. गेल्या तीन-चार दिवसापासून राजेंद्र नागवडे मात्र हेमंत नलगे यांचे मन वळवण्यात पुढाकार घेत होते. अखेर हेमंत नलगे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावून कोणता निर्णय घ्यावा याबाबत कल जाणून घेतला. यात काही कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांच्या सोबत जावे, तर काही कार्यकर्त्यांनी अनुराधा नागवडे यांच्या सोबत असावे असा पर्याय सुचविला.

तद्नंतर मात्र नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी हेमंत नलगे यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. महाविकास आघाडीच्या तिकिटामुळे राजकीय प्राबल्य वाढलेल्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्यासोबत या निवडणुकीत राहण्याचा आपण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. हेमंत नलगे यांच्या निर्णयामुळे जगताप गटाला मात्र खिंडार पडले आहे. आजपर्यंत नागवडे आणि जगताप यांचे कार्यकर्ते एकत्रितरित्या हेमंत नलगे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, पण आता हेमंत नलगे यांनी नागवडे यांना पाठिंबा दिल्याने उर्वरित जगताप समर्थकांनी मात्र तातडीने बैठक घेऊन आपण राहुल जगताप यांचाच प्रचार करायचा असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगताप यांच्या मतात मोठे विभाजन झाले असले तरी नागवडे यांची कोळगावात ताकद वाढल्याचे दिसत आहे. 

जगताप कार्यकर्त्यांची बैठक...
चेअरमन हेमंत नलगे यांनी नागवडे यांना पाठिंबा देतच जगताप समर्थक माजी चेअरमन विजय नलगे, दामू काका साके, सर्वज्ञ मल्टीस्टेटचे राजेंद्र नलगे, कुकडी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विश्वास थोरात, विद्यमान संचालक मच्छिंद्र नलगे, सुभाष लगड, मार्केट कमिटीचे संचालक नितीन डुबल, रघुनाथ लगड तसेच काही माजी ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी संचालक यांनी तातडीने बैठक घेऊन माजी आमदार राहुल जगताप यांना पाठिंबा व्यक्त करून त्यांचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. 


दोन्ही नातेवाईकांना एकत्र आणण्यात नागवडेंना यश...
स्व. शिवाजीराव नागवडे यांची एक बहीण कोळगाव येथील लगड सरदार घराण्यात तर दुसरी बहीण  नलगे सरदार यांच्या घराण्यात देण्यात आली होती. आज पर्यंत सरदार लगड व सुभेदार नलगे यांनी गाव पातळीवर एकमेकांच्या विरोधात राहून सत्ता उपभोगली. या विधानसभा निवडणुकीत लगड सरदार व नलगे सुभेदार यांच्या कुटुंबातून काही जणांचा नागवडे यांना पाठिंबा होता. लगड कुटुंबातील विद्यमान सरपंच पुरुषोत्तम लगड हे नागवडे यांचे नातेवाईक असूनही पाचपुते यांचे गेल्या तीन पंचवार्षिक पासून काम करतात. त्यामुळे हेमंत नलगे यांना नागवडे कुटुंबाकडे ओढून नागवडे यांनी बेरजेचे राजकारण केले आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे लगड व नलगे या दोन्ही नातेवाईकांना एकत्र आणण्यात सध्यातरी नागवडे यांना यश मिळाले आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद

हेमंत नलगे यांच्या नागवडेंसोबत जाण्याचा निर्णय; राहुल जगताप यांना धक्का

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

अपक्ष उमेदवार सुवर्णा पाचपुते यांचे काही ठिकाणचे बॅनर फाडले!

ज्यांनी शेतकऱ्यांचे उसाचे पैसे बुडविले त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही , नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे

माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत - घनश्याम शेलार

अखेर लिंपणगाव ते नागवडे कारखाना रेल्वे गेट नादुरुस्त रस्त्याचा तिढा सुटला !, चर काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिक्रमण रस्ता दुरुस्तीला अडथळा

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येताच पहिले काम काय करणार? नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला निर्णय

महापुरुषांचे उत्कृष्ट प्रकारे गीत गायन रेकॉर्डिंग कार्यक्रम मध्ये साने संगीत जनजागृती लोककला मंचला संधी.

सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर दौंड तालुक्यात निषेध व्यक्त. यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे दिले निवेदन.

म्हसे गावातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांना मोठा प्रतिसाद, सौ नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार म्हसे ग्रामस्थांचा निर्धार

महाविकास आघाडीच्या सौ अनुराधा नागवडे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची तोफ कडाडली

सौ अनुराधाताई नागवडे यांच्या पाठीशी ठाम उभे रहा; 40 वर्ष श्रीगोंद्यात कमळ फुलू देणार नाही - शिवसेना नेते खा संजय राऊत

अपक्ष उमेदवाराला पाठिंबा म्हणजे राजकीय आत्महत्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे.