मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.
By : Polticalface Team ,16-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
सोमवार, दि.१३ जानेवारी, २०२५ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवन सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे येथे मूक नायक मैत्री संघ आणि संघ नायक न्यूज आयोजित मूक नायक स्थापना दिनानिमित्त संघ नायक न्यूजच्या ८ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने, संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल धिवार यांच्या हस्ते करण्यात आले, संघ नायक न्यूजचे सहाय्यक संपादक अमोल लोंढे यांनी स्वागताध्यक्षाची भूमिका बजावली तर ज्येष्ठ समाज सेवक विष्णूदादा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली १०५ वा मुक नायक स्थापना दिन आणि संघ नायक न्यूज चा ०८ वर्धापन दिन उत्साहात सासवड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रा.संदीप टिळेकर,ॲड त्रिरत्ना बागूल, डाॅ.गौतम वनंजे, विलास बोकेफोडे, शिवाजी काळे, अनिल गायकवाड, बाळकृष्ण काकडे यांनी मनोगते व्यक्त करत, संघ नायक न्यूजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या वेळी उपस्थित नागरिकांना पत्रकारीतेचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रिपब्लिकन नेते पंढरीनाथ जाधव,प्रा. बाबासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिव व्याख्याते संजय भालेराव, राष्ट्रीय प्रबोधनकार श्रीकांत होवाळ यांनी पुरस्कारार्थी आणि उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी डाॅ.कुमार लोंढे, ॲड. स्वप्निल बोत्रे, महादेव खेंगरे पाटील, संतोष महाडीक, विलास कोळपे, दादासाहेब गायकवाड, प्रदीप दिवेकर, राजाभाऊ आडागळे, रामदास तुपे,मोहन चिंचकर, दत्तात्रय डाडर,अरुण खरात, दीपक धेंडे, छाया नानगुडे, हनुमंत वाबळे, उत्तम यादव, राजेखान पटेल, कृष्णा फुलवरे, विनोद बेंगळे, सुषमा मस्के तसेच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ८० लोकांना संघ नायक गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
वर्धापन दिनाला संबोधन करताना संपादक प्रा.सदाशिव कांबळे म्हणाले की, संघ नायक गौरव पुरस्कार सोहळा सन्मान चिन्हांसाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी १० हजार रुपये तर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ५ हजार रुपये आर्थिक सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. राजर्षी शाहू महाराजांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना मूक नायक पाक्षिक सुरु करण्यासाठी २५०० रुपये आर्थिक मदत केली होती. तेव्हाच ३१ जानेवारी, १९२० रोजी मूक नायकचा प्रवास सुरु झाला होता. संघ नायक न्यूजला पुढे घेऊन जाण्यासाठी आर्थिक सहकार्य करावे. ज्यांनी आज पर्यंत संघ नायक न्यूजला जगवले, त्यांना मी कदापीही विसरणार नाही. आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,आर्थिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असतो. संघटनेत तथा विविध क्षेत्रात कार्य करताना, प्रमुख भूमिका बजावणारे, हे ख-या अर्थाने संघ नायक आहेत, म्हणूनच त्यांच्या अनमोल कार्यासाठीच संघ नायक गौरव पुरस्कार आम्ही देत आहोत.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जर मूक नायक सुरु केला नसता तर बहुजन पत्रकारीतेचा उदय झालाच नसता. संघ नायक न्यूजने पुणे येथे ३१ जानेवारी,२०२० रोजी मूक नायकचे शताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले होते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी ३१ जानेवारी साजरा करुन डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य व जबाबदारी आहे. मूक नायकचा वारसा आपण सर्वजण पुढे घेऊन जाऊ असे अशी प्रतिक्रिया कांबळे यांनी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेंद्र रणधीर, सूरज गवळी, मल्हारी सोनवणे, आदिनाथ सरवदे, तुकाराम खाजेकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश - प्रा.युवराज पाटील * छत्रपती शिवाजी महाविद्यालयात व्याख्यानमालेचे आयोजन
दौंड शहर भिमनगर येथील लाजवंती भावणदास गैरेला माध्यमिक शाळेतील नवयुग वस्तीगृहातून ७ वी मध्ये शिकत असलेला १२ वर्षाचा विद्यार्थी बेपत्ता. आई वडील झालेत हैराण.
वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड
सरावानेच खेळाडू घडत असतो - सूनीलराव जाधव (श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते)
इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल चे विद्यार्थी खर्ची बंधूंचे ट्रेडिशनल रेस्टलिंग चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश
मुक नायक स्थापना ३१ जानेवारी हाच खरा आपला बहुजन पत्रकार दिन आहे. बहुजन पत्रकारांनी डॉ बाबासाहेबांचा गौरव करणे हे आपले कर्तव्य. प्रा. सदाशिव कांबळे.
पत्रकार माधव बनसुडे व त्यांच्या पत्नी सौ.शुभांगी बनसुडे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार प्रदान
शेतातील शेतगड्याने मालकाच्या परस्पर घरातील महत्वाच्या वस्तू घेऊन गेला पळून. मळद येथील घटना दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील (बोरीबेल) गाडेवाडी येथे भर दिवसा घरफोडी चोरीची घटना. १० लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.
छत्रपती महाविद्यालयाचा राज्यस्तरीय करिअर संसद अधिवेशनात उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्र राज्यातील विविध कॉलेजचे ८०० विद्यार्थी आणि २०० समन्वयक व प्राचार्य यांचा सहभाग.
लोकनेते शिवाजीराव नागवडे बापू यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमाला
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन