नेटके यांच्याशी सविस्तर चर्चा करून व निवेदन पाहुन त्या-त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश- तहसिलदार मिलिंद कुलथे
By : Polticalface Team ,Wed Jan 12 2022 10:42:47 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोदे
श्रीगोंदे तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील असह्य गरीब कुटुंब वयोवृद्ध असणारे सुभाष सोनबा नेटके व त्यांच्या पत्नी लिलाबाई सुभाष नेटके या वृद्ध दाम्पत्यावर. सतत होणाऱ्या अन्यायाची दखल घेवून संबंधित व्यक्ती चे श्रीगोंदे तहसिलदार मिलिंद कुलथे यांनी त्यांचे म्हणेने सविस्तर ऐकून घेऊन व निवेदन पाहून चौकशी चे आदेश दिले.
सविस्तर वृत्त असे आहे की हे वयोवृद्ध दांपत्य शेती करून आपली उपजीविका भागवते, त्यांचा एकुलता एक मुलगा मागच्या वर्षी अटॅकने निधन झाले व त्याच्या पत्नीलाही हाच त्रास असून दोन मुले घेऊन ते पुण्याला उपजीविका करीत राहत आहे, तसेच हे वयोवृद्ध दाम्पत्य अरणगाव दुमाला येथे राहत आहे तसेच वेगवेगळ्या तीन ठिकाणी त्यांची जमीन आहे परंतु या ठिकाणी जमिन कसत असताना त्यांना दर वर्षी वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या स्वतःच्या शेतात गेले तरी शेजारील शिरजोरी,धनदांडगे लोक लगत असणारे जमिनी वाले त्यांना जाणून बुजून त्रास देतात व दमदाटी व जातीवाचक शिव्या देतात, तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना शेजारील व्यक्तींकडून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला होता.तसेच त्यांच्या शेता कडे जाणारे कॅनेल चे पाणी अडविण्यात आले होते, त्या शेतामध्ये उभे पिकामध्ये जनावरे घालणे पाण्याची पाईप लाईन फोडणे, या प्रकारामुळे त्यांनी ते क्षेत्र मिळेल त्या भावामध्ये विकून टाकले. त्यांच्या आता दुसरे शेतामध्ये उसाचे पीक असून दुसऱ्या बाजूचे लोक शेतामध्ये गाडी जाऊन देत नाही व रस्त्याच्या बाजूला जमिनीचा व रस्त्याच्या कडेला खूप मोठं खड्डा केलेला आहे त्यामुळे शेत माल मार्केटला नेणारे वाहनही शेतात मध्ये जात नाही त्यामुळे शेतातील उभी पीके शेतामध्येच आहे, त्यामुळे नेटके यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे, तसेच त्या ठिकाणची शेतातील असणारे बांध तेथील शेजारी नेहमी फोडतात,पिकांचे नुकसान करतात झाडे मोडतात,त्याच प्रमाणे दुसऱ्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये बांधावरून नेहमी त्रास होत असल्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये साग,आंबा,नारळ इत्यादी झाडांची लागवड केली आहे, तरीदेखील शेजारील दोन्ही बाजूचे वरदहस्त कुटुंब नेहमी त्रास देत असतात, बांध मोडतात, जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी देतात, तसेच त्रास देणाऱ्या कुटुंबातील त्यांचा मुलगा सैन्यदलात असल्यामुळे तो म्हणतो मुलाच्या सैनिक दलातुनच तुझ्यावर केस टाकणार आहे, त्यामुळे वयोवृद्ध दांपत्य संपूर्ण पणे भयभीत झाले आहे.
असे सुभाष नेटके यांचे म्हणने आहे, तसेच महाराष्ट्र शासनाचे पाटबंधारे खात्याची असणारी खोली स्वतःच्या फायद्याकरता वापर करणारा व्यक्ती,विज जोडणीसाठी पैसा वरुन वेढीस धरणारा कर्मचारी, रेशन दुकानातील अनेक त्रुटी,अशा एक-ना अनेक कारणां विषयी ते श्रीगोंदे तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. असे वयवृध्द सुभाष नेटके यांनी निवेदनात म्हटले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद