शेतकऱ्यांशी बेइमानी करणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना कारखान्यातून बाहेर काढा - आमदार बबनराव पाचपुते
By : Polticalface Team ,Thu Jan 13 2022 12:04:57 GMT+0530 (India Standard Time)
उस शेती नसताना स्वतःचा मुलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे बिल काढणाऱ्या राजेंद्र नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेइमानी केली आहे. शेतकऱ्यांशी बेइमानी करणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना कारखान्यातून बाहेर काढा आणि कारखान्यात परिवर्तन करा असे प्रतिपादन करत राज्याचे माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या सांगता ऑनलाईन सभेच्या प्रसंगी सभासदांना आवाहन केले.
नागवडे कारखाना निवडणुकीच्या सांगतासभेच्या निमित्ताने काष्टी येथील परिक्रमा कॉलेज मध्ये ऑनलाईन सभेचे आयोजन केले होते यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, संदीप नागवडे, जीजाबापू शिंदे, या सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.पाचपुते यांनी सांगितले की श्रीगोंदा कारखाना हा शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू आहे.परंतु या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने करणार करत कारखान्याच्या माध्यमातून स्वतःच्या संपत्तीत वाढ करत आहेत.राजेंद्र नागवडे सांगतात पाचपुते यांच्यावर आमचे उपकार आहेत मात्र आमच्यावर नागवडे यांचे कोणतेही उपकार नाही मी सात वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलो आहे.तुम्ही आमदार करण्यासाठी भाजप मध्ये आला नाही तर तुमचे कारनामे ची चौकशी लागू नये. इडी ची पिडा लागू नये या साठी तुम्ही माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला आहे. आता तुमचे दिवस संपले आहेत तुम्ही पाठीमागून वार करण्यापेक्षा समोरासमोर येऊन लढा तुम्हाला घरी बसविल्याशिबाय राहणार नाहीत.
नागवडे सहकारी कारखान्यात गेली ११ वर्षापासून डीसलरी बंद आहे. त्यामुळे वर्षाला ९ कोटीचा तोटा होत असून सभासदांच्या उसाला बाजार भाव मिळत नाही. नागवडे यांनी कारखान्यावर ३५० कोटीचे कर्ज केले यात सभासदांचे मोठे नुकसान होत असून हे नुकसान टाळायचे असेल तर कारखाना आमच्या ताब्यात द्या आम्ही पुढील एक वर्षात डीसलेरी चालू करून सभासदांच्या उसाला भाव देऊन सभासदांचे हित साधू असे प्रतिपादन माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांनी यावेळी केले.
यावेळी अण्णासाहेब शेलार, संदीप नागवडे, जिजाबापू शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
चौकट :
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष पद केशव भाऊ मगर यांच्याकडेच देणार....
केशव भाऊ मगर यांनी राजकारणात या पूर्वी मला कधीच मदत केली नाही त्यांनी कायम स्व
बापूंच्या बरोबर राहिले आहेत मात्र त्यांचे वडिलांनी मला आमदार होण्यासाठी मदत केली तसेच १९८४ साली सुद्धा नागवडे कारखान्यासाठी मोठी मदत करून मला कारखान्याचे अध्यक्ष केले. केशव भाऊ हे निषकलांक आहेत. त्यांची पाटी कोरी आहे.राजेंद्र नागवडे यांचा भ्रष्ट कारभार बाहेर काढला आहे. उद्याच्या निवडणुकीत विजयी झाल्या नंतर डॉ.प्रतिभा पाचपुते अथवा भगवानराव पाचपुते यांना अध्यक्ष पद न देता वज्रसारखे एकत्र राहून केशव भाऊ मगर यांनाच अध्यक्ष करणार असल्याचे पाचपुते यांनी प्रतिक्रिया दिली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद