आ.सुरेश धस यांची कंन्टेमेंट झोनमध्ये प्रवेश केल्या प्रकरणातुन निर्दोष मुक्तता
By : Polticalface Team ,Mon Jan 17 2022 10:39:13 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे कोरोना विषाणुचे लागण झालेले रुग्ण आढळुन आल्याने बीड जिल्हयात व इतर ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये या कारणामुळे सांगवी पाटण या गावापासुन तीन किमी परीसरातील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कंन्टेमेंट झोन घोषित करण्यात आला होता.त्या परिसरात अनिश्चित कालावधीसाठी संचार बंदी आदेश लागु करण्यात आली होती.या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आ.सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणातून आ.धस यांची निर्दोष मुक्तता आष्टी न्यायालय प्रथम वर्ग न्यायाधीश के.के.माने यांनी केली आहे.हे प्रकरणाची आ.धस यांच्यावतीने फौजदारी वकील ॲड.राकेश हंबर्डे व ॲड.महादेव मोहिते यांनी काम पाहिले.
बीड जिल्हाधिकारी यांनी दि.१७ मे २०२० रोजी संचारबंदीचा आदेश निर्गमीत करण्यात आले की, सांगवी पाटण येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने गावापासुन तीन किमी परीसरातील सांगवी पाटण, खिळद पाटण,कोहीनी.कारखेल तांडा हा परीसर कंन्टेमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला होता.त्यापुढील चार किमी परीसरातील लिंबोडी, धामनगाव, सुरडी,कारखेल बु,डोईठाण,बाबी,लाटेवाडी व महाजनवाडी ही गावे बफर झोन म्हणुन घोषीत करुन वरील सर्व गावे व परीसर अनिश्चीत कालावधीसाठी पुर्ण वेळ बंद करण्यात येवुन संचार बंदी लागु करण्यात आली होती.हे असताना देखील दि. १८ मे २०२० रोजी आ.धस यांनी सांगवी पाटण या गावात जावुन बीड जिल्हाधिकारी यांचे संचार बंदी आदेशाचे उल्लंघन केले व कोवीड-19 साथ रोगाचे संसर्ग पसरवीण्यासारखे हयगयांचे व घातक कृती करुन राष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली असताना सुदधा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापान कायदा २००५ च्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणुन आ.धस यांच्यावर कलम,१८८,२६९,२७० भादवी सह कलम ५१ (ब)रा.अ.व्य.आधि.२००५ सह कलम १७ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने नऊ साक्षीदार तपासण्यात आले.तर आ.धस यांच्याबाजूने आष्टी न्यायालयाचे विधीज्ञ ॲड.राकेश हंबर्डे यांनी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे दाखल करून सरकार पक्षाला पोलीस दर्जाच्या शिपायांस अशा अपराधाची तक्रार देता येत नाही व सरकार पक्षाने कसलेही कागदोपत्री पुरावा मा.कोर्टासमोर सादर केला नाही.स्वतंत्र साक्षीदार तपासला नाही आदी बाबी भक्कमपणे अंतिम विवेचनात मा.कोर्टाच्या समोर मांडल्या.आष्टी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या खटल्याची प्रभावीपणे भक्कम बाजू मांडत आ.धस यांची सबळ पुराव्या अभावी आष्टी न्यायालय प्रथम वर्ग न्यायाधीश के.के.माने यांनी निर्दोष मुक्तता केली.त्यांना ॲड.महादेव मोहीते, ॲड.बप्पासाहेब खिलारे,ॲड.भाऊसाहेब आजबे यांनी सहकार्य केले तर आष्टी न्यायालयातील सर्व विधीज्ञानी फौजदारी वकील ॲड.राकेश हंबर्डे यांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद