By : Polticalface Team ,Mon Jan 24 2022 21:12:36 GMT+0530 (India Standard Time)
सध्या पंतप्रधान आवास योजनेचा ड यादी चा सर्वे चालू आहे या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी जे निकस घालून दिले आहेत ते अतिशय चुकीचे आहेत ज्या कुटुंबाला दुचाकी असेल अथवा साधा दूरध्वनी असेल किंवा त्याच्याकडे 50 हजाराचे किसान क्रेडिट कार्ड असेल अशांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जात आहे आज गावामध्ये भंगार गोळा करण्यासाठी येणारा सुद्धा दुचाकीवरून येतो कोरोना लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेले तर मोबाईल नंबर घेतल्या शिवाय लस दिल्या जात नाही करुणा आजाराच्या भीतीने शाळा बंद असल्यामुळे मोबाईलवर ऑनलाइन अभ्यासक्रम दिला जातो परंतु मोबाईल असणारा मात्र या घरकुल योजनेसाठी अपात्र केले जाते तसेच ज्यांचे मासिक उत्पन्न 10000 आहे अशांना सुद्धा अपात्र ठरवले जाते आज रोजंदारीने काम करणारा सुद्धा महिन्याला दहा हजार पेक्षा जास्त कमवतो त्यामुळे सरकारला नेमके बेघर वाल्यांना घर द्यायचे आहेत की त्यांना फक्त झुलवत ठेवायचे आहे हे कळत नाही देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली अजूनही आमच्या गरीब माणसाला त्याच्या हक्काचे घर नाही ही या देशाची शोकांतिका आहे आणि म्हणून पेडगाव ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच सौ सुलोचना भगवानराव कणसे यांनी आपल्या सरपंच बंधू-भगिनींना आव्हान केले आहे उद्याच्या 26 जानेवारीला होणाऱ्या ग्रामसभेमध्ये आपण शासनाच्या घरकुल योजनेच्या या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी करून तसा ठराव करावा 50000 हजाराच्या किसान क्रेडिट कार्डच्या रकमेची मर्यादा वाढवून दोन लाख करावी तसेच तीस हजारापेक्षा जास्त उत्पन्न असणारा लाच अपात्र करावे फ्रिज दुचाकी दूरध्वनी या अटी रद्द कराव्यात अशाप्रकारे ठराव करून खासदार साहेबा मार्फत केंद्र शासनाकडे मागणी
वाचक क्रमांक :