कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतली सदिच्छा भेट
By : Polticalface Team ,Sun Jan 30 2022 20:45:40 GMT+0530 (India Standard Time)
नाशिक,पिंपळगाव बसवंत, दि.३० जानेवारी :-थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक चवळवळीचे काम छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे नेले. या विचारांचा वारसा पुढे नेऊन समाजसेवेचे अतिशय मौल्यवान कार्य कर्मवीर गणपतदादा मोरे आणि त्यांच्या पत्नी यांनी पुढे नेले असून सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचे हे सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या पिंपळगाव बसवंत येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे, प्रा.अशोक पिंगळे, प्रा.अशोक सोनवणे, सुरेश खोडे, बाळासाहेब बनकर, गणेश बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी दि. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.१८७३ साली ज्योतिबांनी शेतकऱ्यांचा असूड हा शेतकऱ्यांच्या व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडणाऱा ग्रंथ प्रकाशित केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर सत्यशोधक समाजाच्या कार्यात ज्योतिबांना अतिशय खंबीरपणे साथ दिली. सावित्रीबाईनीं शेवटच्या श्वासापर्यंत सत्यशोधक समाजाचे काम अविरतपणे केले.ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यानंतर सत्यशोधक समाजाच्या कामाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी चालना दिली.ह्याच विचारांचा वारसा पुढे चालवितांना समाजधुरिणांनी शिक्षणावीना समाजाची प्रगती शक्य नाही,हे अचुक सत्य हेरले.समाजातील अज्ञान व अंधश्रध्देचा अंधकार दुर करण्यासाठी आयुष्य वेचले.त्यात अग्रक्रमाने नामोल्लेख होतो तो सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांचा.सत्यशोधक समाजाचा विचार जनमानसात रूजविण्याबरोबरच बहुजन समाजाला शिक्षणांची दारे खुली करून देण्याचे अजोड कार्य त्यांनी केले असे त्यानी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, सत्यशोधक कर्मवीर गणपतदादा मोरे यांच्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा होती. आज या भेटीचा योग आला हे माझे भाग्य समजतो. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले तसेच कार्य कर्मवीर गणपतदादा मोरे आणि त्यांच्या पत्नीने केले. मनुवादाच्या अन्यायाच्या विरोधात लढलेल्या या कर्मवीरांचे विचार आपल्याला विसरता कामा नये. त्यासाठी आपण किमान एक पाऊल पुढं आलं पाहिजे.आपण महापुरुषांचे विचार नवीन पिढीमध्ये रुजविण्यास कमी पडलो तर आपण गुन्हेगार ठरू असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की समाजात अजूनही अंधश्रद्धा कमी झालेली नाही ती दूर करण्यासाठी महापुरुषांचे विचार आपल्याला जपायला हवे. इतिहास हा चुकीच्या पद्धतीने पसरविण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महात्मा जोतीराव फुले यांनी लिहिलेलं शेतकऱ्यांचा आसूड आणि गुलामगिरी ही पुस्तके प्रत्येकाने वाचण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद